फिरत्या लोकन्यायालयात ३१ खटले निकाली

0 5

बोदवड : येथे फिरत्या लोकन्यायालयात ३१ खटले निकाली काढण्यात आले. महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरणामार्फत फिरते लोकन्यायालय (मोबाइल व्हॅन)चे …

बोदवड : येथे फिरत्या लोकन्यायालयात ३१ खटले निकाली काढण्यात आले.

महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरणामार्फत फिरते लोकन्यायालय (मोबाइल व्हॅन)चे आयोजन करण्यात आले. पॅनलमध्ये न्यायालयाचे न्यायाधीश एस.डी. गरड हे पॅनल प्रमुख म्हणून होते, तर बोदवड वकील संघाचे अर्जुन पाटील, के.एस. इंगळे पॅनल सदस्य म्हणून होते.

न्यायालयात प्रलंबित प्रकरणांपैकी एकूण ३१ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला व त्यामधून २२ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. यशस्वीतेसाठी बोदवड न्यायालयातील कर्मचारी सहायक अधीक्षक.जे. बी. पाटील, एस.पी.आठवले, एस एस परसे, बाविस्कर, जाधव, थोरात, सोनवणे आदींनी प्रयत्न केले. यावेळी जिल्हाभरातून वकील मंडळी तसेच बोदवड येथील प्रतिष्ठित व्यापारी तसेच पक्षकार उपस्थित होते. फिरत्या न्यायालयामार्फत पक्षकारांना त्यांच्या केसचा ताबडतोब निपटारा झाल्यामुळे पक्षकार मंडळींनी आनंद व्यक्त केला. न्यायालयात यावेळी बोदवड पोलिसांमार्फत बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.