मौजमजेसाठी तरुणांनी जालना, धुळे, नगरमधून चोरल्या तब्बल 35 दुचाकी; 33 लाखांच्या दुचाकी पोलिसांकडून जप्त

पिंपरी- चिंचवड दरोडाविरोधी पथकाकडून तिघांना अटक

0 0

तीन चोरट्यांनी पुणे, लातूर, जालना, धुळे, अहमदनगर या जिल्ह्यातून तब्बल ३५ दुचाकी चोरल्या. दुचाकी तिसऱ्या साथीदाराच्या मदतीने किरकोळ किमतीत विकल्या. कागदपत्रे नंतर देतो म्हणून मिळतील तेवढे पैसे घ्यायचे आणि त्या पैशांवर मौजमजा करायची, असा या टोळीचा सपाटा सुरू होता. पिंपरी चिंचवड पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या असून ३३ लाखांच्या ३६ दुचाकी जप्त केल्या आहेत.

संकेत आनंदा धुमाळ (२२,रा. आंबेगाव), श्रीकांत बाबाजी पटाडे (२३, रा. जुन्नर, ) आणि सुनील आबाजी सुक्रे (२६, रा. आंबेगाव पुणे) अशी चोरांची नावे आहेत.

वखार महामंडळ चौक, पुणे नाशिक हायवे, भोसरी येथे दोन जण चोरीची दुचाकी विकण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना कळाली. त्यानुसार एका पथकाने परिसरात सापळा लावला. मात्र, चोरटे ठरलेल्या ठिकाणी आले नाहीत. त्यातील एकजण आंबेगाव येथे असल्याची माहिती मिळाली. तिथे संकेत धुमाळ याला १४ एप्रिल रोजी पोलिसांनी अटक केली.

धुमाळकडे चौकशी करून त्याचा दुसरा साथीदार श्रीकांत पटाडे याला ताब्यात घेतले. दोघांकडे तपास करून पोलिसांनी सुनील सुक्रे याला १५ एप्रिल रोजी ताब्यात घेतले. सुनीलवर यापूर्वी तीन वाहन चोरीचे गुन्हे दाखल असल्याने या चोरट्यांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

Leave A Reply

Your email address will not be published.