सजग तरुणामुळे चिमुकलीची अपहरणकर्त्याच्या तावडीतून सुटका; असा उधळला डाव

Minor Girl Kidnap Case: सासवडमधील (Saswad) एका तरुणाच्या प्रसंगावधानामुळे एका चार वर्षाची चिमुकली अपहरणापासून (minor girl kidnapping) वाचली आहे. आरोपी तरुण संबंधित मुलीला विकण्यासाठी दुसऱ्या जिल्ह्यात घेऊन चालला होता.

0 16

सासवड, 05 जून: सासवडमधील (Saswad) एका तरुणाच्या प्रसंगावधानामुळे एक चार वर्षाची चिमुकली अपहरणापासून (minor girl kidnapping) वाचली आहे. आरोपी तरुण संबंधित मुलीला विकण्यासाठी दुसऱ्या जिल्ह्यात घेऊन चालला होता. त्यावेळी संशय आल्याने एका तरुणाने याची माहिती पोलिसांना दिली. एवढंच नव्हे, तर आरोपी तरुणाला बातचित करण्यात गुंतवलं. त्यामुळे सासवड पोलिसांना संबंधित 4 वर्षाच्या चिमुकलीची अपहरणकर्त्याच्या तावडीतून सुटका करणं शक्य झालं आहे. पोलिसांनी संबंधित मुलीला कुटुंबीयांच्या ताब्यात दिलं असून अपहरणाची माहिती देण्याऱ्या तरुणाचं पोलिसांनी कौतुक केलं आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 वर्षाची पीडित मुलगी गुरूवारी रात्री पुण्यातील स्वारगेट बस स्टॅंड परिसरात आपल्या आईसोबत झोपली होती. यावेळी आरोपी रात्रीचा फायदा घेऊन या मुलीचं अपहरण केलं. पीडित मुलीच्या आईला रात्री एक वाजता जेव्हा जाग आली. त्यावेळी तिची मुलगी बेपत्ता असल्याचं तिच्या निदर्शनास आलं. यानंतर पीडितेच्या आई वडिलांनी तातडीने स्वारगेट पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत, अपहरण झालेल्या मुलीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला. त्याचबरोबर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे अज्ञात अपहरणकर्त्याचा शोध सुरू केला.

Leave A Reply

Your email address will not be published.