‘अग्निवीर’साठी ५९ हजार ९११ तरुण इच्छुक; २२ सप्टेंबरला शारीरिक चाचणी
अग्निवीर बननण्यासाठी विदर्भातील ५९ हजार ९९१ युवका इच्छुक आहेत. त्यांची शारीरिक चाचणी २२ सप्टेंबरला नागपूर येथे होणार आहे.
नागपूर : अग्निवीर बननण्यासाठी विदर्भातील ५९ हजार ९९१ युवका इच्छुक आहेत. त्यांची शारीरिक चाचणी २२ सप्टेंबरला नागपूर येथे होणार आहे. संरक्षण मंत्रालयाने ‘अग्निवीर‘ म्हणून लष्करात भरतीसाठी तिन्ही दलाने ‘अग्निपथ’ योजना सुरू केली आहे. त्यासाठी पुणे आणि नागपूर सैन्य भरती कार्यालयांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भातील उमेदवारांसाठी भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. ऑनलाईन नोंदणी केलेल्या उमेदवारांना प्रवेशपत्र संबंधितांच्या इ-मेलद्वारे १० ऑगस्ट ते २० ऑगस्ट २०२२ पर्यंत पाठवण्यात येणार आहेत.