शेगावच्या 6 वर्षीय चिमुकलीनं नेटकऱ्यांना लावलं वेड; नटखट अभिनयाचे इंटरनेटवर लाखो चाहते

शेगाव येथील एका सहा वर्षाच्या चिमुकलीचे भन्नाट व्हिडीओ लाखों नेटकऱ्यांना सध्या वेड लावत आहेत. कादंबरी ढमाळ असं या चिमुकलीचं नाव असून तिला सोशल मीडियावर जवळपास 1.9 मिलियन (19 लाख) फॉलोअर्स देखील आहेत.

0 25

बुलडाणा, 25 जून: दररोज सोशल मीडियावर लाखो व्हिडीओ व्हायरल होतं असतात. यामध्ये अनकेदा लहान मुलांचे व्हिडीओ देखील असतात. लहान मुलांच्या निरागस नटखटपणामुळे त्यांचे व्हिडीओ व्हायरल होतं असतात. अशातच बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथील एका सहा वर्षाच्या चिमुकलीचे भन्नाट व्हिडीओ लाखों नेटकऱ्यांना सध्या वेड लावत आहेत. कादंबरी ढमाळ असं या चिमुकलीचं नाव असून तिला सोशल मीडियावर जवळपास 1.9 मिलियन (19 लाख) फॉलोअर्स देखील आहेत. यावरून तिची सोशल मीडियात लोकप्रियता किती आहे, हे लक्षात येतं.

बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथील रहिवासी असणाऱ्या कांदबरीचा एका शेतकरी कुटुंबात जन्म झाला आहे. सध्या सीनियर केजीमध्ये शिकत असलेली कांदबरी मागील दीड वर्षांपासून शाळेची पायरी देखील चढली नाही. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळं शाळा फक्त नावाला उरली आहे. त्यामुळे मिळालेल्या मोकळ्या वेळेत कांदबरीनं विविध व्हिडीओ तयार केले आहेत. या व्हिडीओतील तिच्या नटखट अभिनयाचे सोशल मीडियावर लाखो चाहते झाले आहेत. तिनं अनेक नेटकऱ्यांना वेड लावलं आहे.

एकेदिवशी कादंबरीनं इन्स्टाग्रामवर श्रद्धा शिंदे यांचे व्हिडीओ पाहिले होते. हे व्हिडीओ कादंबरीला प्रचंड आवडले. त्यामुळे तिनं अशाच प्रकारचे व्हिडीओ बनवण्याचा हट्ट वडिलांकडे धरला. यातून या नटखट कलाकाराचा जन्म झाला. तेव्हापासून तिनं व्हिडीओ बनवायला सुरुवात केली. तिनं छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या अभिनयानं ती एका रात्रीत प्रसिद्धी झोतात आली. विशेष म्हणजे शिवमुद्रा तोंडपाठ असल्यानं तिचं मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे. नुकतंच तिनं अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त व्हिडीओ तयार केला होती. तो व्हिडीओही प्रचंड गाजला आहे.

टिंडा’ या सोशल मीडियावर App वर कादंबरीचे 1.9 मिलियन फॉलोअर्स आहेत. इन्स्टाग्रामवर आता हळुहळु तिची लोकप्रियता वाढत चालली आहे. अजून शाळेची पायरीही न चढलेली कांदबरी सोशल मीडियावर स्टार झाली आहे. देशभरात अनेकांनी कांदबरीच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे. अनेकांच्या वॉट्सअॅप स्टेटसला देखील कांदबरीचे व्हिडीओ ठेवलेले असतात.

Leave A Reply

Your email address will not be published.