धक्कादायक! Homeopathic medicine घेतल्यानंतर एकाच कुटुंबातील 8 जणांचा मृत्यू

0 124

बिलासपूर : सध्या कोरोना काळात प्रत्येक जण कोरोनापासून (Coronavirus) आपला बचाव करण्याचा प्रयत्न करत आहे. भारतात कोरोना महासाथीचा जेव्हा सुरुवातीला उद्रेक झाला, त्यावेळी त्यापासून संरक्षण करण्यासाठी अनेक मार्ग शोधले जाऊ लागले. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यावर भर देण्यात आला. याचदरम्यान होमिओपॅथिक औषधांचंही (Homeopathic Medicine) वाटप केलं जात होतं. कित्येक लोकांना होमिओपॅथिक औषधं दिली जात होती. दरम्यान आता असंच होमिओपॅथिक औषध घेतल्यानंतर एकाच कुटुंबातील 8 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे (People dead after consuming a homeopathic medicine).

ही घटना आहे, छत्तीसगडच्या (Chhattisgarh) बिलासपूरमधील (Bilaspur). इथल्या एका कुटुंबातील सदस्यांनी होमिओपॅथिक औषधांचं सेवन केलं. त्यानंतर 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 5 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.

एएनआयशी बोलताना मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं, “या लोकांनी ड्रोसेरा 30 (Drosera 30) हे होमिओपॅथिक औषध घेतलं होतं. ज्यामध्ये 91% अल्कोहोल होतं. हे औषध देणारा डॉक्टर फरार झाला आहे”

Leave A Reply

Your email address will not be published.