ठाकरे सरकारची वचनपूर्ती, 9 लाख कामगारांना खात्यात पैसे जमा!

नोंदणीकृत कामगारांच्या खात्यात 1500 रुपयांचे अर्थसाह्य त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये थेट जमा करण्यात आले आहेत.

0 8

मुंबई  : राज्यात लॉकडाऊन (Maharashtra Lockdown) जाहीर झाल्यानंतर गोरगरीब बांधकाम कामगारांना (Construction workers) आर्थिक मदत जाहीर राज्य सरकारच्या (MVA Goverment) वतीने करण्यात आली होती. त्यानुसार आता नोंदणीकृत असलेल्या बांधकाम कामगारांची संख्या दीड लाखाच्या आसपास असून त्यापैकी 9 लाख 17 हजार नोंदणीकृत बांधकाम कामगारांना राज्य सरकारच्या वतीने अर्थसाह्य देण्यात आले आहे. मागील चार दिवसांमध्ये कामगार विभागाच्या वतीने 137 कोटी 61 लाख रुपयांचा निधी थेट बांधकाम कामगारांच्या खात्यात जमा झाल्याची माहिती राज्याचे कामगार मंत्री हसन मुश्रीफ (Hassan Mushrif) यांनी दिली आहे.

राज्यात कोविड संकट असल्याने कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. या काळात महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांना आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला होता. या निर्णयानुसार महाराष्ट्र इमारत, बांधकाम व इतर कामगार कल्याणकारी मंडळातर्फे नोंदणीकृत कामगारांच्या खात्यात 1500 रुपयांचे अर्थसाह्य त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये थेट जमा करण्यात आले आहेत. त्यानुसार, राज्य सरकारच्या कामगार विभागाच्या वतीने हे पैसे थेट बांधकाम मजुरांच्या खात्यात जमा झाल्याची माहिती  हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.

या निर्णयाचा फायदा राज्यातील नोंदणीकृत कामगारांना मिळत असून महाराष्ट्रात इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळामार्फत या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. गेल्या वर्षी देखील अशा विषाणूच्या प्रादुर्भाव कालावधीत नोंदणी बांधकाम कामगारांना प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत देण्यात आली होती

सध्या राज्यात 1 मे 2019 पर्यंत कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे कामगारांना त्यांची कामे पूर्ववत करणे शक्य नाही. कदाचित पुढील कालावधीमध्ये सुद्धा कडक निर्बंध कालावधी वाढवण्याची शक्यता आहे, अशा कालावधीत गोरगरीब कामगारांना त्यांच्या खात्यात पैसे मिळाल्याने थोडासा दिलासा मिळेल, अशी भूमिका हसन मुश्रीफ यांनी मांडली आहे. नोंदणीकृत बांधकाम कामगारांची मोफत आरोग्य तपासणी करण्याची मंडळाकडून देखील योजना राबविण्यात येत असून आतापर्यंत 2 लाख कामगारांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे सर्व नदणीकृत कामगारांची युद्धपातळीवर आरोग्य तपासणी करण्याचे कामगार विभागाच्या वतीने आयोजित केले गेले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.