मनमाड : देव तारी त्याला कोण मारी; हृदयविकाराचे 4 झटके येऊनही नाशकातील 92 वर्षीय वयोवृद्धाची कोरोनावर मात

कोरोना विषाणूचा नवीन स्ट्रेन वयोवृद्धांसोबतच तरुणांसाठी आणि लहान मुलांसाठीही धोक्याची घंटी ठरत आहे. अशा स्थितीत मनमाडमधील एका 92 वर्षीय वयोवृद्ध रुग्णाने हृदयविकाराचे चार झटके येऊनही कोरोना विषाणूला हरवलं आहे.

0 20

मनमाड : कोरोना विषाणूची दुसरी लाट जगभरासाठी अत्यंत घातक ठरत आहेत. यामुळे भारतासोबतच इतर देशातील अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोना विषाणूचा नवीन स्ट्रेन वयोवृद्धांसोबतच तरुणांसाठी आणि लहान मुलांसाठीही धोक्याची घंटी ठरत आहे. अशा स्थितीत मनमाडमधील एका 92 वर्षीय वयोवृद्ध रुग्णाने हृदयविकाराचे चार झटके येऊनही कोरोना विषाणूला हरवलं आहे. विविध शारीरिक आजारांनी ग्रस्त असतानाही कोरोनाला हरवल्यानं त्यांच्या जिद्दीचं आणि सकारात्मकतेचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे.

संबंधित 92 वर्षीय वयोवृद्धाचं नाव नामदेव किसन शिंदे असून ते रेल्वे विभागाचे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. नामदेव शिंदे हे गेल्या 26 दिवसांपासून कोरोना विषाणूशी झुंज देत होते. दरम्यानच्या काळात त्यांची प्रकृती अनेकदा बिघडली. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे त्यांची शारीरिक गुंतागुंतही वाढली होती. पण त्यांनी 26 दिवस कोरोनाशी लढा देऊन शेवटी कोरोनाला हरवून सुखरुप घरी परतले आहेत. त्यामुळे कुटुंबीयांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे.

92 वर्षीय किसन शिंदे यांना एकूण चार वेळा हृदयविकाराचा झटकाही आला आहे. त्यामुळे त्यांच्यावर अँजिओप्लास्टीची गुंतागुंतीची आणि जटील शस्त्रक्रियाही करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त त्यांना उच्च रक्तदाबाचा आणि मधुमेहाचा त्रासही आहे. असं असताना त्यांनी यशस्वीपणे कोरोनावर मात केली आहे. विशेष म्हणजे, ज्या रुग्णांना मधुमेह किंवा हृदयविकाराचा त्रास आहे, अशा लोकांसाठी कोरोना विषाणू अधिक धोकादायक मानला जातो.

यावेळी त्यांनी सांगितलं की, कोरोनाला  घाबरून न जाता सकारात्मक विचार ठेवलं आणि डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे योग्यवेळी औषधं घेतली तर कोरोनावर नक्की मात करता येते. एवढ्या शारीरिक व्याधी असताना त्यांनी कोरोनावर मात केल्यानं ‘देव तारी त्याला कोण मारी’ ही मराठी म्हण पुन्हा एकदा सार्थ ठरली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.