अतिरिक्त शिक्षकांची प्रतिनियुक्ती रद्द करा
शिक्षक समन्वय समितीची गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनामार्फत मागणी
शेगांव :
पंचायत समिती अंतर्गत कार्यरत असलेल्या जिल्हा परिषद शाळेवर कार्यरत असलेल्या प्राथमिक शिक्षकांचे स्थानांतर प्रक्रिया जिल्हा स्तरावरून सुरू असुन आंतरजिल्हा जिल्हा बदली प्रक्रिया अंतीम टप्प्यात आहे तसेच जिल्हांतर्गत प्रशासकीय स्थानांतर प्रक्रिया सुद्धा तीस सप्टेंबरच्या संचमान्यतेनुसार लवकरच सुरू होणार आहे म्हणून पंचायत समिती स्तरावरून नुकतीच करण्यात आलेली अतिरिक्त शिक्षकांची तात्पुरती समायोजन प्रतिनियुक्ती रद्द करण्यात यावी.
पंचायत समिती स्तरावरील शिक्षकांची समायोजन प्रतिनियुक्ती आदेश अस्थायी स्वरूपाचा व अल्प कालावधीचा असल्यामुळे अतिरिक्त शिक्षकांची स्थानांतरामुळे होणारी गैरसोय टाळण्याकरिता तात्पुरती करण्यात आलेली समायोजन प्रतिनियुक्ती रद्द करण्यात यावी व शिक्षकावर होणारा अन्याय दुर करण्यात यावा,अतिरिक्त शिक्षकांच्या मागणीनुसार रिक्त शाळेवर प्रतिनियुक्ती करण्यात यावी अशी मागणी प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र रोठे,तालुकाध्यक्ष सुनिल घावट, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष अंनतराव वानखडे,तालुकाध्यक्ष प्रविण कात्रे,दिपक अकोटकार, शिवाजी ढगे,रमेश कडू,विजय टापरे,जी.डी.गवई आदी समन्वय समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
सदर निवेदनाच्या प्रतिलिपी मुख्यकार्यपालन अधिकारी साहेब,शिक्षणाधिकारी बुलडाणा,गटशिक्षणाधिकारी शेगांव यांना सादर करण्यात आलेल्या आहेत.
शिक्षण विभागाच्या अधीक्षक यांना निवेदन सादर करतांना प्रहार शिक्षक संघटनेचे व समन्वय समितीचे पदाधिकारी