शिक्षकांच्या अन्यायकारक केलेल्या बदल्या रद्द करा
शेगांव :
तात्पुरत्या स्वरूपाच्या शैक्षणिक व्यवस्थापनासाठी जिल्हा परिषद शाळेवर कार्यरत असलेल्या अतिरिक्त शिक्षकांच्या बदल्या करण्यात आलेल्या असुन सदर बदली प्रक्रियेमध्ये शिक्षकांवर अन्याय झालेला आहे,तीस सप्टेंबरच्या संचमान्यतेनुसार लवकरच नियमानुसार शिक्षकांच्या बदल्या होणारच आहेत म्हणून पंचायत समिती स्तरावरून नुकत्याच करण्यात आलेल्या अतिरिक्त शिक्षकांचे प्रतिनियुक्ती आदेश रद्द करण्यात यावेत अशी मागणी प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र रोठे,तालुकाध्यक्ष सुनिल घावट,शिक्षक सेनेचे तालुकाध्यक्ष प्रमोद इंगळे,कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष अंनतराव वानखडे,तालुकाध्यक्ष प्रविण कात्रे,दिपक अकोटकार, शिवाजी ढगे,रमेश कडू,विजय टापरे,जी.डी.गवई आदी समन्वय समितीचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.
सदर निवेदनाच्या प्रतिलिपी मुख्यकार्यपालन अधिकारी साहेब,शिक्षणाधिकारी ( प्राथमिक विभाग ) बुलडाणा,गटशिक्षणाधिकारी शेगांव यांना सादर करण्यात आलेल्या आहेत.
गटविकास अधिकारी यांच्याकडे शिक्षकांच्या समस्यांबाबत निवेदन सादर करतांना शिक्षक समन्वय समितीचे पदाधिकारी