मास्क न वापरण्यात मुंबईकर ‘अव्वल’, वर्षभरात तब्बल 54 कोटी दंड वसुल!

मुंबई महापालिकेकडून संपूर्ण वर्षभरात मास्क न घालणाऱ्यांच्या विरोधात केलेल्या कार्यवाहीत 54 कोटी रुपये गोळा केले आहेत.

0 12

मुंबई : कोरोनाचा (Corona) संसर्ग वाढू नये आणि आपल्याला लागण होऊ नये यासाठी मास्क (Mask) घालवा, अशी सूचना वारंवार प्रशासनाकडून केली जात असते. पण, तरीही काही महाभाग हे मास्क न वापरात बेफामपणे फिरत असतात. मुंबईत गेल्या वर्षभरात तब्बल 54 कोटींचा दंड मास्क न घालणाऱ्याकडून वसुल केला आहे. तर पुण्यात (Pune) 17 कोटी 85 लाख रुपयांचा दंड वसुल केला आहे.

मुंबई आणि पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी पालिका प्रशासनाकडून कडक कारवाई केली जाते. सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. पण, असं असलं तरी काही लोकं मास्क वापरत नाही. अशा लोकांकडून पालिकांनी ‘क्लीन अप मार्शल’ मार्फत दंड गोळा केला आहे.

मुंबई महापालिकेकडून संपूर्ण वर्षभरात मास्क न घालणाऱ्यांच्या विरोधात केलेल्या कार्यवाहीत 54 कोटी रुपये गोळा केले आहेत. मुंबईत मास्क न वापरणाऱ्या विरोधात 200 रुपये दंडाची कारवाई केली जाते. ‘क्लीन अप मार्शल’मार्फत ही कारवाई केली जाते. आता पोलीस कर्मचाऱ्यांना ही कारवाई करण्याचा अधिकार देण्यात आला आहे.

मुंबईत रेल्वेत, शहर परिसरात क्लीन अप मार्शल आणि पोलीस यांच्या मार्फत कारवाई होते. तिन्ही रेल्वे लाईनवर प्रत्येकी 100 या प्रमाणे 300 मार्शल लावण्यात आले आहे.

तर पुण्यात पुणे पोलिसांनी वर्षभरात मास्क न घालणाऱ्या तब्बल 3 लाख 54 हजार 969 पुणेकरांवर दंडात्मक कारवाई केली आहे.  त्यांच्याकडून 17 कोटी 85 लाख रुपयांचा दंड केला वसुल केला आहे. शहरात दररोज विना मास्क फिरणारे किमान दोन ते तीन हजार नागरिक पोलिसांना दिसत असून पोलिसांकडून त्यांच्यावर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे.

परिमंडळनिहाय विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर पोलिसांनी केलेली कारवाई

परिमंडळ एक – 78 हजार 137

परिमंडळ दोन- 52 हजार 761

परिमंडळ तीन – 62 हजार 121

परिमंडळ चार- 66 हजार 853

परिमंडळ पाच- 55 हजार 642

वाहतूक शाखा- 39 हजार 455

एकंदरीत मुंबई आणि पुणे शहरात गेल्या वर्षभरात मास्क न वापरणाऱ्यांवर करण्यात आलेल्या कारवाईवरून कुठल्या शहरात किती बेफिकर लोकं आहे. याचा अंदाज दंडाच्या रक्कमेवरून येतोय. मुंबईच्या तुलनेत पुण्यात दंड वसुलीही दुप्पटीने कमी आहे. याचाच असा अर्थ असाही होतो की, पुण्यात मास्कचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. तर मुंबईत मात्र, बेफिकीर लोकांची कमी नाही, असंच दिसून येतंय.

Leave A Reply

Your email address will not be published.