अभिनेता करण वाहीला जीवे मारण्य़ाची धमकी; कुभंमेळ्यातील नागा साधूंवर पोस्ट करणं महागात

करण वाहीचं सडेतोड उत्तर

0 0

देशात एकीकडे करोना रुग्णांची संख्या वाढतेय अशात हरिद्वारमधील कुंभ मेळ्यात अनेकांनी गर्दी केली आहे. कुंभमेळ्यात नागा साधुंच्या गर्दीवर पोस्ट करणं मात्र अभिनेता करण वाहीला महागात पडलं आहे. करणच्या पोस्टमुळे त्याला ट्रोल व्हावं लागलं असून त्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

अभिनेता करण वाहीने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहली होती. या तो म्हणाला होता, “नागा बाबांसाठी वर्क फ्रॉम होम कल्चर नाही आहे का? म्हणजे गंगेचं पाणी घरी आणा आणि आंघोळ करा.” मात्र करण वाहीची ही पोस्ट अनेकांना आवडली नाही. त्यामुळे सोशल मीडियावर करणला ट्रोल केलं जातं आहे. त्याने स्वत: त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्टोरी पोस्ट करत लोकांकडून येणाऱ्या प्रतिक्रिया शेअर केल्या आहेत.

सोशल मीडियावरून जीवे मारण्याची धमकी
करण वाहीला सोशल मीडियावर त्याच्या पोस्टमुळे नेटकऱ्यांच्या संतापाला सामोरं जावं लागतंय. ‘हिंदू भावना दुखावल्याचा’ आरोप अनेकांनी त्याच्यावर केला आहे. त्याचसोबत पोस्ट डिलीट कर नाही तर नाही तर तुझ्यावर बहिष्कार घालू अशा कमेंट करणला आल्या आहेत. त्याचसोबत करणला अनेकांनी शिवीगाळ केली आहे.

करण वाहीचं सडेतोड उत्तर

अनेकांनी ट्रोल करूनही करण वाहीने ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. काही युजर्सनी “तुला हिंदू धर्माविषयी जाण आहे का?” असा सवाल केलाय, यावर करणने भगवद् गीता, कुराण आणि बायबलचा फोटो शेअर करत आपण तीनही पुस्तकं वाचली असल्याचं सांगितलं आहे. तर एका पोस्टमध्ये तो म्हणाला, “तर मला शिवीगाळ करणारे आणि संतापजनक मेसेज आले आहेत. जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. वा भारतवासीयांनो, जर हिंदू होण्याचा अर्थ कोव्हिडच्या नियमांकडे दूर्लक्ष करणं आहे. तर तुमच्यापैकी अनेकांना हे वाचण्याची घेण्याची गरज आहे की हिंदू असणं म्हणजे काय.”

Leave A Reply

Your email address will not be published.