Indian Idol 12: अमित कुमार यांच्यावर भडकला आदित्य नारायण; शो आवडला नाही तर आधीच तसं सांगायचं….

अमित कुमारांच्या आरोपावर आदित्यने अखेर मौन सोडले...

0 34

सोनी टीव्ही वरचा सर्वात लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो ‘इंडियन आयडल १२’ सध्या एका एपिसोडमुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. रविवारी या शोमध्ये किशोर कुमार स्पेशल एपिसोड ठेवण्यात आला होता. या एपिसोडमध्ये स्पर्धक आणि जजेसनी किशोर कुमार यांचे १०० गाणी गायली. या एपिसोड मध्ये किशोर कुमार यांचा मुलगा गायक-दिग्दर्शक अमित कुमार हे प्रमुख पाहूणे म्हणून गेले होते. या शोमधून परतल्यानंतर अमित कुमार यांनी या शोबाबत त्यांनी नाराजी व्यक्त करत एपिसोड आवडला नसल्याचं ही उघडपणे सांगितलं आहे. यावर आता इंडियन आयडल शोचा सुत्रसंचालक आदित्य नारायण याने मौन सोडले आणि अमित कुमार यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

एका माध्यमाशी बोलताना अमित कुमारांच्या वक्तव्यावर त्याने ही प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी आदित्य नारायण म्हणाला, “एका दिग्गज गायकाला आणि ते ही किशोर कुमार सारख्या गायकाला अवघ्या काही तासांमध्ये ट्रिब्यूट देणं हे काही सोप्पं काम नाही….”. आपला शो आणि मेकर्सची बाजू सावरत आदित्य पुढे म्हणाला, “सर्व स्पर्धक आणि युनिटसोबत आम्ही सर्वच जण दमणमध्ये शिफ्ट झालो…तिथे शूटिंग सुरू आहे….सराव सुरू आहे…जर शूटिंग दरम्यान अमित कुमार यांना काही गोष्टी आवडल्या नव्हत्या तर ते तिथेच आम्हाला सांगू शकले असते…”.

 

यापुढे बोलताना आदित्य नारायणने आणखी काही गोष्टी शेअर केल्या. यात तो म्हणाला, “यापूर्वी अनेकदा अमितकुमार आमच्या शोच्या सेटवर आले होते. शोमध्ये त्यांच्या येण्याने एपिसोडला कायम रंगत आली होती. दोन दिवसांपूर्वी सुद्धा ते आले तेव्हा त्यांनी सर्व स्पर्धकांची गाणी शांत ऐकली. त्यावर त्यांनी सकारात्मक प्रतिक्रिया ही दिल्या. या शोमध्ये त्यांनी किशोरदां सोबतचे अनेक किस्से देखील शेअर केले. जर त्यांनी आम्हाला तेव्हाच ही गोष्ट सांगितली असती तर आम्ही त्यावर त्यांचं समाधान केलं असतं. पण त्यावेळी ते काहीच बोलले नाहीत. मग शो मधून परतल्यानंतर त्यांनी ही नाराजी का व्यक्त केली, हे समजत नाही.”

सध्या या शोचा टीआरपी घसरला आहे. एकीकडे अमित कुमार यांच्या आरोपांमुळे या शोवर टीका करण्यात येत आहे. तर दुसरीकडे याच शोचे जजेस नेहा कक्कर आणि हिमेश रेशमिया या दोघांनी किशोर कुमार यांचं गाणं अगदी चुकीच्या पद्धतीने गायल्यामुळे ते दोघेही ट्रोल होत आहेत. त्यामुळे हा शो सध्या बऱ्याच चर्चेत आलाय.

Leave A Reply

Your email address will not be published.