शेतकरी, त्याचं कुटुंब शेतात राबल्यानं कोरोना संकटात अन्न धान्य पुरलं, दादा भुसेंचं वक्तव्य, पुरेशा पावसानंतर पेरणीचं आवाहन

0 6

महाराष्ट्राचे कृषी मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी पुरेसा पाऊस होत नाही तो पर्यंत पेरणी करू नका, असं आवाहन शेतकऱ्यांना केलं आहे.

 

नाशिक: महाराष्ट्राचे कृषी मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी पुरेसा पाऊस होत नाही तो पर्यंत पेरणी करू नका, असं आवाहन शेतकऱ्यांना केलं आहे. महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना पेरणीचा मोठा अनुभव आहे. व्यवस्थित पाऊस होत नाही तोपर्यंत पेरणी करू नका, असं ते म्हणाले आहेत. महाविकास आघाडी सरकारचं धोरण शेतकऱ्यांना दोन पैसे मिळाले पाहिजे असंच आहे,असं देखील ते म्हणाले. ते शेतकरी कार्यशाळेत बोलत होते. (Agriculture Minister Dada Bhuse appeal farmers start cultivation after sufficient rain)

विकेल ते पिकेल ही मुख्यमंत्र्यांची संकल्पना

शेतकरी कार्यशाळेत बोलताना दादा भुसे यांनी 1 जुलै हा कृषी दिवस केला जातो. महाराष्ट्रात गेल्या वर्षी कृषी सप्ताह साजरा केला होता. विकेल ते पिकेल ही थीम मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मांडली होती. बाहेरील व्यापारी अनेकदा शेतकऱ्यांचे पैसे घेऊन पोबारा करतात. कृषी कायद्यात काही बदल करणार आहोत.या बाबत कठोर पाऊल उचलणार आहे. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांना कठोर शासन करणार आहोत. येणाऱ्या अधिवेशनात यावर निर्णय शक्य आहे. दुबार पेरणीची सध्या तरी तक्रार आलेली नाही. राज्यात आतापर्यंत 27 टक्के पाऊस झाला आहे.

कोरोना संकटकाळात अन्न धान्य कमी पडल नाही कारण शेतकरी आणि त्याचं कुटुंब शेतात राबलं यामुळे ते शक्य झालं. गेल्या वर्षी खतांची मागणी वाढली होती. 90 हजार मेट्रिक टन युरियाचा स्टॉक करण्याचा निर्णय घेण्यात आला. युरिया दोन दिवसात उपलब्ध होईल असं नियोजन करण्यात आलं आहे.

अनिल देशुख यांच्यावरील ईडी कारवाईबद्दल विचारलं असता दादा भुसे यांनी मी सामान्य कार्यकर्ता आहे. लोकशाहीत जनता जनार्दन सर्वश्रेष्ठ आहे.काही निर्णय जनता जनार्दनावर सोडायचे असतात, असं दादा भुसे म्हणाले.

किरीट सोमय्या वर्षानुवर्ष आरोप करतात

भाजप नेते किरीट सोमैय्या वर्षानुवर्ष आरोप करतात हे महाराष्ट्राला माहिती आहे. त्यांनी काही क्रिएटिव्ह काम केलं आहे का? सोमय्या यांनी केलेले आरोप निष्पन्न झाले अशा किती घटना आहेत, असा सवाल देखील दादा भुसे यांनी केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.