बॉलिवूडचा सिंघम आला मदतीला; २० आयसीयू बेडसाठी दिले १ कोटी रुपये

देशात कोरोना (Corona) स्थिती भयानक झाली आहे, कोरोनाचा संख्या दिवसागणिक वाढत आहे. वाढत्या रुग्णांमुळे रुग्णालयां (Hospital)मध्ये बेड्स उपलब्ध होत नाही.

0 9

मुंबई : देशात कोरोना (Corona) स्थिती भयानक झाली आहे, कोरोनाचा संख्या दिवसागणिक वाढत आहे. वाढत्या रुग्णांमुळे रुग्णालयां (Hospital)मध्ये बेड्स उपलब्ध होत नाही तर कुठे ऑक्सिजन. आरोग्याच्या सुविधेचा तुवटवडा पाहून आता सेलिब्रिटी (Celebrity) मदतीसाठी पुढे येताना दिसत आहेत. बॉलिवूडचा सुपरस्टर अजय देवगन (Actor Ajay devgan) याने कोरोनाबाधितांना मदत केली आहे.

अजय देवगनने शिवाजी पार्क (Shivaji Partk)मध्ये आयसीयूची सुविधा असलेले २० बेडची व्यवस्था केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अजय देवगनने बीएमसी (Brihanmumbai Municipal Corporation) ला १ कोटी रुपयांची रक्कम दिली आहे ज्यातून २० बेड असलेले इमरजेंसी हॉस्पीटल तयार केले जाईल. दरम्यान याआधी अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्नानेही १०० ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्स मागवले आहेत. तर दुसरीकडे सलमान खानने स्वंयपाक घरातून जेवण बनवून फ्रंटलाइन वर्कर्सला वाटप केले होती.
तर आयुष्मान खुराना आणि त्याची पत्नी ताहिरा कश्यप यांनी मुख्यमंत्री सहाय्यताला आर्थिक मदत केली.

यासह शिल्पा शेट्टी, भूमी पेडनेकर, सु्ष्मिता सेन, कॅटरिना कैफ, विक्की कौशल या सारख्या अभिनेत्यांनीही  कोरोना योद्धांना मदत केली होती. यासह ते नागरिकांना आवाहन करत आहेत की, कोणीही घराबाहेर निघू नका. आवश्यक कामासाठी घराबाहेर पडत असाल तर तोंडावर मास्क लावा. देशातील काही राज्यात भयाण स्थिती असून आपण हिंमतीने या संकटाला सामोरे जावू आणि जिंकू असं आवाहन वारंवार अभिनेत्यांकडून करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.