अकोला : घर कोसळून एकाच कुटुंबातील पाच जण ढिगाऱ्याखाली दबले, चिमुरड्याचा मृत्यू

शेख रसूल शेख वजीर यांचं पूर्ण कुटुंब भिंतीच्या ढिगाऱ्याखाली दबलं होतं. पाच जण गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर दुर्दैवाने त्यांचा 9 वर्षीय धाकटा मुलगा शेख कामरान याचा मृत्यू झाला

0 23

अकोला : घर कोसळल्याने एकाच कुटुंबातील ढिगाऱ्याखाली दबले गेले. या घटनेत 5 जण गंभीर जखमी झाले आहेत, तर 9 वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. अकोला जिल्हातील बाळापूर शहरातील सतरंजीपुरा येथे ही दुर्दैवी घटना घडली. (Akola House collapsed five member family stuck below 9 years old child dies)

नेमकं काय घडलं

अकोला जिल्ह्यातील बाळापूर शहरात राहणारे शेख रसूल आपल्या कुटुंबासमवेत नेहमीप्रमाणे घरात झोपले होते. शनिवारी पहाटे 4 वाजताच्या सुमारास अचानक त्यांचं घर कोसळलं. त्यानंतर संपूर्ण कुटुंब भिंतीच्या ढिगाऱ्याखाली दबलं गेलं.

शेजारी मदतीला धावले

घर कोसळल्याचा आवाज ऐकून साजिद इकबाल अब्दुल रशीद हा शेजारी धावत आला. आजूबाजूचे रहिवासी आणि आपल्या दोन भावांना सोबत घेऊन तो तातडीने घटनास्थळी पोहोचला. ढिगाऱ्याखाली दबलेल्या महिलेला आणि तिच्या मुलांना त्यांनी बाहेर काढले.

पाच जण गंभीर, बालकाचा मृत्यू

शेख रसूल शेख वजीर यांचं पूर्ण कुटुंब भिंतीच्या ढिगाऱ्या खाली दबलं होतं. कुटुंबातील लोकांना बाळापूरच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. घर कोसळून झालेल्या दुर्घटनेत पाच जण गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र दुर्दैवाने त्यांचा 9 वर्षीय धाकटा मुलगा शेख कामरान याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

कुटुंबीयांना मदतीची मागणी

शेख रसूल शेख वजीर यांची परिस्थिती हलाखीची असून मोलमजुरी करुन ते आपले कुटूंब चालवत होते. अशा परिस्थितीत शासनाने त्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.