लॉकडाऊनमुळे शेतातच रंगला जुगार क्लब, २९ जणांना अटक, १५ लाखांचा मुद्देमाल जप्त

लॉकडाऊनमुळे जुगाऱ्यांनी थेट शेतामध्ये जुगारी क्लब सुरू केला. लॉकडाऊनचे कडक निर्बंध असतानाही एकाच ठिकाणावरून पोलिसांनी तब्बल २९ अटक केली आहे. तर यावेळी लाखोंचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.

0 55

हायलाइट्स:

  • शेतात खुलेआम चालणाऱ्या जुगराच्या क्लबवर छापा
  • १५ लाखांचा मुद्देमाल जप्त, २९ जुगाऱ्यांना अटक
  • विशेष पथकाच्या पीएसआय स्वाती इथापे यांची कारवाई

अकोला : अकोल्यातील गायगांव शेत शिवारातील प्रकाश वानखड़े यांच्या शिवारात शेतात खुलेआम चालणाऱ्या जुगराच्या क्लबवर छापा टाकण्यात आला आहे. पोलिसांनी या ठिकाणाहुन १५ लाखांवर मुद्देमाल जप्त केला असून २९ जुगाऱ्यांना अटक केली. ही कारवाई विशेष पथकाच्या पीएसआय स्वाती इथापे यांनी केली आहे..

अकोल्यातील गायगांव शेत शिवारातील प्रकाश वानखड़े यांच्या शेतात खुलेआम जुगार क्लब सुरु आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी रविवारी दुपारच्या सुमारास या जुगार क्लबवर छापा टाकला.

या कारवाई दरम्यान तब्बल २९ लोकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. तसेच त्यांच्याकडून रोख रक्कम २ लाख रुपये, १३ मोटर सायकली व चारचाकी वाहन होंडा सीटी आणि जुगार साहित्य असा एकत्रित १५ लाख रूपयांचा जुगाराचे मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अकोला जिल्हा पोलीस अधिक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाचे पीएसआय स्वाती इथापे यांनी ही कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश वानखडे हा सदर व्यक्ती जुगार क्लब चालत असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच पोलिसांच्या विशेष पथकाने केलेल्या कारवाईनंतर आता स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण होते.

Leave A Reply

Your email address will not be published.