Akola News : स्मशानभूमी झाले पर्यटनस्थळ, सेवानिवृत्त मित्रांनी काम केले भारी!

2018 पासून सुरू असलेल्या श्रमदानामुळे आज हे गरुड धाम लोकांचं पर्यटनस्थळ बनलं आहे.

0 2

अकोला : सेवानिवृत्त (Retired ) झाल्यावर आता काय करावं? असा प्रश्न पडतो. शासकीय नोकरीमधून बाहेर पडल्यावर अनेकांना समाजसेवा करण्याची संधी मिळते. परंतु, या संधीचा लाभ काहीच लोक घेतात. अश्याच प्रकारे अकोल्याच्या (Akola) तेल्हारा तालुक्यातील दानापूरच्या काही सेवानिवृत्त लोकांनी स्मशानभूमीच कायापालट केलं आहे.

स्मशानभूमी म्हटली की, डोळ्यापुढे येतो तो शेवटचा क्षण अंत्ययात्रा व त्या अंत्ययात्रेत समाविष्ट झालेले लोक हे असं एकंदरीत चित्र, पडक स्मशानभूमीचं शेड, आजूबाजूला स्मशान शांतता मात्र. असं काहीसं चित्र. परंतु, दानापूर येथिल स्मशानभूमी या सर्व गोष्टीला अपवाद ठरत आहे. तेल्हारा तालुक्यातील दानापूर हे गाव आता आपली वेगळी ओळख निर्माण करीत आहे. या गावाची ख्याती आजही पंचक्रोशीत ओळखली जाते.

येथिल उत्तरे कडील गरुड धाम स्मशानभूमी आपल्या नावाचा डंका पंचक्रोशीत गाजवत आहे. सगळ्या सुविधांनी नटलेली स्मशान भूमी(गरुड धाम) आज दानापूर सह परिसरातील लोकांची पर्यटन स्थळाच्या रूपाने नावलौकिकास आली आहे. विविध क्षेत्रातील सेवानिवृत्त मित्रांनी एका ठिकाणी येऊन या स्मशानभूमीचा कायापालट केला आहे. यातील कोणी शिक्षक, लिपिक , पोस्टमन, चपराशी, तर कोणी शेतकरी आहे. या मित्रांनी एकत्र येऊन कधीही मेहनतीचं काम न केलेल्या मित्रांनी हातात कुऱ्हाड विळा, फावड घेऊन, श्रमदान करून जे जमेल ते काम व गावकऱ्यांच्या सहकार्यातून या गरुड धाम (स्मशान भूमीचं) रुपडं बदलून टाकलं.

2018 पासून सुरू असलेल्या श्रमदानामुळे आज हे गरुड धाम लोकांचं पर्यटनस्थळ बनलं आहे. साडेतीन एकरात वसलेल गरुड धाम(स्मशानभूमी) उत्तरेकडील साडेतीन एकराच्या परिसरात आहे. त्यामुळे येथे श्रमदानातून मोठया प्रमाणावर काम करण्यात आले आहे. या स्मशानभूमीमध्ये कडुलिंब, पिंपळ, वड, बांबू, आशा विविध प्रकारच्या जातीचे 290 झाडे लावण्यात आली आहेत. सोबतच फुलांची अतिशय मोहक झाडे दुतर्फा लावण्यात आले आहेत. अंत्यसंस्कार करण्यासाठी आलेल्या लोकांना बसण्याची अद्यावत सुविधा, पोडियम बांधण्यात आले आहे. त्याच बरोबर भगवान शंकराची मोठी महाकाय मूर्तीची स्थापना सुद्धा करण्यात आली आहे. कोरोनामुळे आता सर्व शाळा ,महाविद्यालय, विद्यालय बंद आहेत. त्यामुळे या ठिकाणी विद्यार्थी निसर्गरम्य वातावरणात अभ्यास करण्यासाठी येतात. या गरुड धाममध्ये अंत्यविधी करिता आलेल्या लोकांना स्वच्छता राखावी या करिता सूचना फलक व कचरा कुंडी यांचा उपयोग करावा असे आवर्जुन सांगण्यात येते.

Leave A Reply

Your email address will not be published.