Gautam Gambhir च्या संस्थेला Akshay Kumar ने केली मोठी मदत; कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी दिले 1 कोटी रुपये

अक्षय कुमारच्या या कामगिरीनंतर लोक पुन्हा एकदा अभिनेत्याचे कौतुक करत आहेत. याआधीही अक्षय कुमारने मदतीचा हात पुढे केला होता.

0 7

देशात कोरोनाची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. कोरोनावर नियंत्रण ठेवणे सरकारसाठी दिवसेंदिवस अवघड होत आहे. अशा परिस्थितीत लोक पुन्हा एकदा त्यांच्या वतीने मदतीचा हात पुढे करत आहेत. अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) ने पुन्हा एकदा लोकांना मदत करण्यासाठी हात पुढे केला आहे.

अक्षय कुमारने गौतम गंभीर (Gautam Gambhir) च्या संस्थेला 1 कोटी रुपयांची मदत केली आहे. वास्तविक, गौतमची संस्था गरीब लोकांच्या अन्नाची व्यवस्था करते. अक्षय कुमारच्या मदतीनंतर गौतम गंभीर यांनी सोशल मीडियावर यासंदर्भात माहिती दिली आहे.

गौतम गंभीरने सोशल मीडियावर लिहिलं आहे की, ‘यावेळी प्रत्येक मदत ही एक आशेचा किरण आहे. अक्षय कुमार यांनी गौतम गंभीर फाउंडेशनला 1 कोटी रुपयांची मदत दिल्याबद्दल त्यांचे आभार. या पैशाने गरजू लोकांना अन्न, औषधे आणि ऑक्सिजनची व्यवस्था केली जाईल.’

गौतम गंभीरच्या या ट्विटला उत्तर देताना अक्षय कुमारने लिहिलं आहे की, ‘ही खरोखर कठीण वेळ आहे. मला आनंद वाटतो की, मी मदत करू शकलो. लवकरचं या संकटातून बाहेर पडण्याची आशा आहे. सुरक्षित रहा.’

अक्षय कुमारच्या या कामगिरीनंतर लोक पुन्हा एकदा अभिनेत्याचे कौतुक करत आहेत. याआधीही अक्षय कुमारने मदतीचा हात पुढे केला होता. यापूर्वी अक्षय कुमारने पीएम मोदी फंडात 24 कोटी रुपयांची देणगी दिली होती.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.