सर्व जिवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ७ ते ११ सुरु राहणार जिल्हाधिकारी यांचा आदेश

कृषी संबंधित दुकाने सकाळी ९ ते ४, बॅक सकाळी १० ते दुपारी २, पेट्रोल पंप सकाळी ७ ते ११ सुरु

0 7

खामगाव : ब्रेक द चेन कोरोना पार्श्वभूमीवर पादुर्भावाच्या जिल्हाधीकारीनी आज सुधारीत आदेश काढला असून यामध्ये सर्व प्रकारच्या जिवनावश्यक वस्तुंचे दुकाने सकाळी ७ ते सकाळी ११ सुरु करण्यात आले आहे.

या आदेशामुळे नविन नियम दिले असून निर्बंधासहीत सूट देण्यात आलेल्या सेवामध्ये सर्व प्रकारची जिवनावश्यवक वस्तुची दुकाने किराणा, स्वस्त धान्य दुकान, वासह भाजीपाला व फळ विक्रि दुकांनाना एकाच ठिकाणी न लावता वेगवेगळ्या ठिकाणी खुल्या मैदानात दोन मिटर अंतर ठेवून संबंधित मुख्याधिकारी यांच्या निर्देशनानुसार लावण्याची परवानगी दिली आहे.

सदर दुकानावर गर्दी होणार नाही याकरीता फिरत्या पथकाची नेमणूक करावी तसेच होम डिलेवरीच्या दृष्टीने जास्तीत जास्त नागरीकांना घरपोच भाजी फळ मिळेल याचे नियोजन करावे. दूध व दुधजन्य पदार्थाची विक्री घरपोच दुध पोचविण्याकरीता सकाळी ६ ते ९ व सायंकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत सुट देण्यात आली आहे. सर्व प्रकारचे खाद्य दुकाने अंडा, चिकन, मास मासे, स्विटमार्ट यांना सकाळी ७ ते सकाळी ११. कृषी सेवा केंद्र व कृषी अवजारांची दुकाने कृषी प्रक्रिया उद्योग गृह, शेती अवजारे, आणि शेतीतील उप्तादनाशी संबंधित दुकाने यांना सकाळी ९ ते ४ पर्वत या सर्व ठिकाणी सोशल डिस्टसिंग, मास्कचावापर, सॅनिटायझर आदी नियमाचे काटेकोर पालन करण्याचे आदेशात नमूद केले आहे.

बुलडाणा जिल्हाधिकारी यांचा आदेश सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा   

बुलडाणा आदेश दि.19.5.2021

सर्व राष्ट्रीयकृत बैंक, खाजगी बैंक, बिगर बँकीग वित्तीय संस्था, सुक्ष्म वित्तीय संस्था, सहकारी संस्था, पतपेढी संस्था, विमा, पोस्ट पेमेंट बँक व आर्थिक बाबीशी संबंधित असलेल्या सर्ववित्तीय संस्था यांना त्यांचे कामकाज सकाळी १० ते दुपारी २ पर्यंत सुरु राहील. तसेच एटीएम मध्ये २४ तास रक्कम ठेवण्याचे नियोजन करण्याचे आदेश बँक मॅनेजर यांनी करावे, यासोबतबटरी, ईनव्हर्टर, यूपीस यांना आवश्यकतेनुसार रुग्णालय, कोविड हॉस्पिटल, असीवु, ईत्यादीना सामुग्री पोहचविण्याचे नियोजन करण्याचे आदेश संबंधितांना दिले आहे.

या दुकानाना किरकोळ विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे. रेस्टॉरंट, भोजनालय यांना सकाळी ७ ते ८ यांना केवळ होम डिलेवरीची मुभा राहिल. कृषी उत्पन्न बाजार समिमी २३ मेपर्यंत बंद राहतील. सर्व वकील, चार्टड अकाऊंटंट यांची कार्यालय सकाळी १० ते ६ पर्यंत सुरू रहातील. ऑप्टीकल दुकाने सकाळी ९ ते रात्री ८ वृत्तपत्र छपाई, वितरण, शिवभोजन नियमित वेळेनुसार सुरु राहील. सराफा व्यावसायिकाना दुकाने उघडून तपासणी करण्याकरीता आठवड्यातील गुरुवारी सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत उघडता येतील. हे आदेश जिल्हाधिकारी यानी लागु केले असून याची अमलबजावणी आजपासुन सुरु करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.