भारतापेक्षा अमेरिकेची शेती वेगळी किती, पाहा अमेरिकन शेतकरी कसे करतो शेती

भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि भारताचे ग्रामीण जीवन हा येथील संस्कृतीचा पाया आहे. मात्र अमेरिकेतील गावं कशी असतात, तेथील शेतकरी कसे राहतात, कसे शेती करतात याचा कधी तुम्ही विचार केला आहे का?

0 61

नवी दिल्ली : भारत हा कृषीप्रधान देश आहे. आजही देशातील बहुतांश जनता गावातच राहते. लोकसंख्येचा मोठा हिस्सा हा शेतीवर अवलंबून आहे. मात्र आजही भारतातील शेती ही मानवी श्रमांनी किंवा बऱ्याचअंशी पारंपारिक पद्धतीनेच होते. त्याउलट अमेरिकेतील संस्कृती आहे. अमेरिकेतील गावं कशी असतात, तेथील शेतकरी कसे राहतात, कसे शेती करतात याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? पाहूया तेथील गावांचे आणि शेतकऱ्यांचे फोटो.

अमेरिकेत शेती करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. शेती पूर्णपणे यांत्रिक पद्धतीने केली जाते. अमेरिकेतील शेतकरी शेतीचा विचार व्यापारी दृष्टीनेच करतात. अमेरिकेत एकाच शेतात अनेक प्रकारची पीकं घेतली जातात. या फोटोंमधून तुम्ही अंदाज लावू शकता की तेथील गावं किती वेगळी आहेत. तिथल्या शेतीचे स्वरुप किती वेगळे आहे.

कशी असतात अमेरिकेतील गावं- अमेरिकेतील गाव आधुनिक असतातच परंतु तेथील गावं आणि शेती हिरवेगार असते. अर्थात भारत आणि अमेरिकेतील गावं ही काही बाबतीत किंवा दिसताना एकमेकांसारखीच असतात. मात्र तरीही अमेरिकेतील गावांचे काही वैशिष्ट्ये असतातच.

अमेरिकेत फक्त २३ लाख शेतकरी आहेत. त्यांच्याकडे सरासरी २५० हेक्टर जमीन आहे. अमेरिकेतील शेतकरी कुटुंब हे सुशिक्षित असते. नव्याने लागणाऱ्या शोधांचा आणि संशोधनाचा वापर तेथील शेतकरी आपल्या शेतात करत असतो.

Leave A Reply

Your email address will not be published.