VIDEO | कोरोना काळात सुप्त गुणांना वाव, अमरावतीत लहानग्यांचा नृत्याविष्कार

मुलांच्या गुणांना वाव मिळावा यासाठी अमरावतीतील मंगेश मनोहरे मित्र मंडळीच्या वतीने बाल नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली. (Amravati Dance Competition)

0 7

अमरावती : कोरोना आणि लॉकडाऊनमुळे गेल्या दीड वर्षापासून अधिक काळ ऑनलाईन शिक्षण सुरु आहे. त्यामुळे अनेक मुलं मोबाईल आणि लॅपटॉपचा सर्रास वापर करताना दिसतात. यामुळे अनेक मुलांच्या सुप्त गुणांना वाव मिळत नाही. या मुलांच्या गुणांना वाव मिळावा यासाठी अमरावतीतील मंगेश मनोहरे मित्र मंडळीच्या वतीने बाल नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली. यात अनेक लहान मुलांनी सहभाग नोंदवला. (Amravati Dance Competition for Children’s)

अमरावतीमध्ये कोरोना काळात गेल्या दीड वर्षांहून अधिक वेळ विद्यार्थ्यांची घरातून शाळा सुरु आहे. त्यामुळे कधी नव्हे ते अनेक मुलं मोबाईल किंवा लॅपटॉपसमोर बसलेले दिसतात. आतापर्यंत मुलांपासून मोबाईल किंवा तत्सम यंत्र लांब ठेवले जात होते. मात्र कोरोनामुळे अनेक मुलं हे बराच काळ मोबाईलवर क्लासेसच्या व्यतिरिक्त वेळात गेम खेळणे, व्हिडीओ पाहत असतात. त्यामुळे त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळत नाही.

याच बाबीचा विचार करून मंगेश मनोहरे मित्र मंडळाच्या वतीने बाल नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यावेळी अनेक लहान मुलांनी या स्पर्धेत भाग घेतला. त्यावेळी अनेकांनी उत्कृष्ट नृत्य केले. या लहान मुलाचे नृत्य बघून मोठ्यांच्या चेहऱ्यावर तब्बल दोन वर्षांनी आनंद परत दिसला. या स्पर्धेनंतर बालकांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. (Amravati Dance Competition for Children’s)

Leave A Reply

Your email address will not be published.