स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला महारचिकना येथे सुरुवात

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला महारचिकना येथे सुरुवात

0

उध्दव नागरे
लोणार : 
तालुका प्रतिनिधी
भारतीय स्वातंत्र्याच्या ‘अमृत महोत्सव’ निमित्त राबविण्यात येणाऱ्या हर घर तिरंगा अभियान ला आज महार चिकना गावामध्ये सुरुवात झाली. भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहेत.या गौरवशाली पर्वानिमित्त देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून अमृत महोत्सव संपूर्ण देशभरात साजरा होते आहे. त्यानिमित्त जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मुर्ती तेवत राहाव्यात व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायम स्वरुपी मनात राहावी म्हणून 9 ते 15 ऑगस्ट रोजी हर घर तिरंगा अभियान राबविण्यात येत आहे.या अभियानात महार चिकना ग्रामस्थ सहभागी झाले आहे. आज गावामध्ये जिल्हा परिषद मराठी शाळेमधील मुलांची प्रभातफेरी काढण्यात आली. व गावातील नागरिकांना घरोघरी जाऊन आज 210 तिरंगा झेंडा वाटप करण्यात आला.यामध्ये ग्रामसेवक दत्ता बेंडमाळी ,उध्दव नागरे संगणक परिचालक, समाधान पार शिपाई,दिपक घुगे रोजगार सेवक,प्रकाश घुगे ,पुंडलिक नागरे,ज्येष्ठ नागरिक,विजय वायाळ सर मुख्याध्यापक, आढाव सर,लोखंडे सर,चव्हाण सर ,राठोड मॅडम,शिवकन्या घुगे,सुमन ढाकणे अंगणवाडी सेविका,सरस्वती घुगे,गंगासागर नागरे अंगणवाडी मदतनीस व शिवानंद कायांदे,प्रकाश नागरे, इतर नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.