शेगाव तालुक्यातील ग्राम चिंचखेड येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला सुरुवात.
शेगांव :
भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असल्यामुळे देशभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे त्या अनुषंगाने शासन परिपत्रकानुसार पंचायत समिती अंतर्गत असलेल्या ग्राम चिंचखेड येथे ९ आॕगस्ट रोजी शाळेतील विद्यार्थी व गावातील नागरिकांनी प्रभातफेरी काढून जनजागृती केली,त्यानंतर शिवाजी चौकामध्ये सर्व एकत्र येऊन सामुहिक राष्ट्रगीत घेण्यात आले तसेच भारतीय तिरंगा विषयी उदघोषणा देण्यात आल्या.
शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद इंगळे यांनी १३ आॕगस्ट ते १७ आॕगस्ट दरम्यान संपूर्ण गावात राबविण्यात येणाऱ्या “हर घर तिरंगा” या उपक्रमाविषयी मार्गदर्शन केले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत घेण्यात आलेल्या सामुहिक राष्ट्रगीत गायनाकरीता सरपंच ,उपसरपंच,पोलीस पाटील,शाळा व्यवस्थापन समीती अध्यक्ष ,सदस्यगण,ग्राम पंचायत सदस्य,अंगणवाडी सेविका ,मदतनीस,आरोग्य कर्मचारी ,आशा वर्कर,बचतगट सदस्या,शाळेतील सर्व शिक्षक ,गावातील महिला व नागरिक बहुसंख्येने संख्येने उपस्थित होते.