‘म्हणून मुलींवर बलात्कार होतात’, कपड्यांवरुन ट्रोल करणाऱ्याला अभिनेत्रीने दिले उत्तर म्हणाली…

तिने ट्रोलर्सला चांगलेच सुनावले आहे.

0 77

बॉलिवूड कलाकार हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ते सतत त्यांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतात. पण बऱ्याच वेळा त्यांना ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागतो. असेच काहीसे अभिनेत्री अमायरा दस्तूरसोबत घडले आहे. सध्या अमायरा तिचा आगामी चित्रपट ‘कोई जाने ना’च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. दरम्यान तिने शेअर केलेल्या व्हिडीओवर एक चाहत्याने कमेंट करत तिला ट्रोल केले आहे.

अमायराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘डोंट रश’वर डान्स करतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. तिचा डान्स पाहून अनेकांनी तिची प्रशंसा केली. दरम्यान तिने पांढऱ्या रंगाचा टॉप आणि शॉर्ट पँट परिधान केली होती. तिचा हा आऊटफिट पाहून काही चाहत्यांनी तिला ट्रोल केले आहे.

 

एका यूजरने ‘म्हणून मुलींवर बलात्कार होतात. कारण सार्वजनिक ठिकाणी कशाप्रकारचे कपडे घालायचे हे त्यांना कळत नाही’ असे म्हणत अमायराला ट्रोल केले होते. तर दुसऱ्या एका यूजरने ‘हा खरच खूर शॉर्ट ड्रेस आहे’ असे म्हटले. या सर्व कमेंट पाहिल्यानंतर अमायरा देखील शांत बसली नाही. तिने ट्रोलर्सला चांगलेच सुनावले.

‘तुमच्यासारखी मानसिकता असल्यामुळे स्त्रियांवर बलात्कार होतात. महिलांनी कसे कपडे घालावेत हे तुम्ही शिकवू नका. मुलांना महिलांचा आदर करायला आणि पुरुषांना बलात्कार करु नये असे शिकवा’ असे म्हणत अमायराने त्यांना चांगलेच सुनावले आहे.

अमायराने एका वेब सीरिजमध्ये काम केले आहे. तसेच तिने काही दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. आता ती लवकरच ‘कोई जाने ना’ या चित्रपटात दिसणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.