पालिकेने मैदानाला ठोकले टाळे:लॉकडाऊनमध्ये अनिल अंबानी कुटुंबीयांचा महाबळेश्वरात गोल्फ मैदानावर मॉर्निंग वॉक

व्हिडिओ व्हायरल होताच पालिकेची क्लबला तंबी, मैदानाला ठोकले टाळे

0 26

उद्योगपती अन् रिलायन्स एडीएजी ग्रुपचे अध्यक्ष अनिल अंबानी आपली पत्नी टीना आणि दोन मुलांसह महाबळेश्वरमधील गोल्फ कोर्स मैदानावर सकाळ-सायंकाळ फेरफटका मारण्यासाठी येत असल्याचा व्हिडिओ रविवारी सायंकाळी व्हायरल झाला. लॉकडाऊन असूनही अंबानी कुटुंबीयांचा हा मुक्तसंचार पाहून महाबळेश्वर पालिकेने मैदानाची मालकी असलेल्या दि गोल्फ क्लबला दंडात्मक कारवाईचा इशारा देताच क्लबने सोमवारी मैदानाला टाळे ठोकले आहे.

सध्या महाराष्ट्रात लॉकडाऊन सुरू आहे. जिल्हाबंदी जाहीर करण्यात आली आहे. अनिल अंबानी मागील पंधरा दिवसांपासून पत्नी टीना अंबानी व कुटुंबीयांसह महाबळेश्वर येथे डायमंड किंग अनुप मेहतांच्या बंगल्यावर वास्तव्यास आहेत. नियमित सवयीप्रमाणे अंबानी कुटुंबीय दररोज सकाळ आणि संध्याकाळी फिरण्यासाठी गोल्फ मैदानावर येतात.

रविवारी सायंकाळी अंबानी दांपत्य आपल्या दोन्ही मुलांसह गोल्फ मैदानावर फेरफटका मारण्यासाठी आले होते. मात्र ही खबर शहरात पसरताच शहरातील इतर नागरिकांनाही आपला दैनंदिन मार्ग बदलून सकाळ-संध्याकाळ गोल्फ मैदान गाठणे सुरू केले. त्यामुळे गर्दी वाढली.

दरम्यान, लॉकडाऊन नियमावली मोडून उद्योगपती कुटुंबीयांसह गोल्फ मैदानावर येतात ही माहिती काही स्थानिकांकडून मिळताच पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी भोरे-पाटील यांनी खात्री करून घेतली व मैदानाची मालकी असलेल्या दि गोल्फ क्लबच्या मुख्य सचिवांना नोटीस बजावली. संचारबंदी लागू असताना मैदानावर गर्दी कशी होते याप्रकरणी दंडात्मक कारवाईची नोटीस बजावताच हे मैदान सोमवारपासून बंद करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.