
शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक आमसभेची विषय पत्रिका पुस्तिका सभासदांना वितरीत
अल्प कालावधीत वचननाम्यानुसार शिक्षक हिताच्या सुविधेची वचन पुर्तता
शेगांव :
पंचायत समिती प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित शेगांव र.न.९५३ ची वार्षिक सर्वसाधारण सभा दि.०७ ऑगष्ट २०२२ रोजी सेठ ग.भि.मुरारका महाविद्यालय येथे आयोजित केलेली असुन सदर सभेच्या विषय पत्रिकेच्या नोटीस सभासदांना वितरित करण्यात आलेल्या आहेत.
सभेपुढील मध्यम मुदती कर्ज व मासिक वर्गणी मध्ये वाढ करणे ,नफा-तोटा विनियोग व शेअर्सवर लाभांश वाटपाबाबत चर्चा करणे,नियमीत सभासदाना कर्ज माफी योजना लागु करणे,सभासद कल्याण निधी व मृत्यू अनुदान निधीचे स्वंतत्र खाते तयार करणे,प्रथम कर्ज एक लाख रूपये वाटप करणे असे सभासदाच्या हितासाठीचे अनेक महत्वाचे विषय आहेत.
मयत सभासदास एक लाख रूपये मृत्यू अनुदान वाटप करणे,सभासदाच्या गुणवंत पाल्यांचा गुणगौरव करणे,सेवानिवृत्त सभासदांचा सत्कार करणे,लॅप-टॉप कर्ज सुविधा देणे,सभासदांना अधिवेशन कर्ज सुविधा देणे असे पतसंस्थेचे अनेक उपक्रम आहेत.
अल्प कालावधीतच एस.एम.एस. सुविधेचा सभासदांना लाभ देणे,मुख्याध्यापक यांच्या सहीचे कर्जासाठी हमीपत्र स्विकारणे,संस्थेचे सर्व व्यवहार भारतीय स्टेट बॅकेमधुन करणे,पदाधिकाऱ्यांचा सुरू असलेला मोबाईल भत्ता बंद करण्यात आलेला आहे अशी वचननाम्याप्रमाणे संचालकांनी सभेमध्ये निर्णय घेऊन वचनपुर्ती केलेली आहे.
पतसंस्थेच्या भविष्यातील कर्ज मर्यादा दहा लाख रूपये करणे,तातडी कर्ज पन्नास हजार रूपये व पंच्याहत्तर हजार रूपये करणे,मृत्यु अनुदान निधी दोन लाख रूपयापर्यंत वाढविणे,सेवानिवृत्त सभासदांना रू. अकरा हजाराचा धनादेश देवून सन्मान करणे,कन्यादान योजने अंतर्गत सभासदांच्या मुलीच्या लग्नप्रसंगी अकरा हजार रूपयाचा धनादेश देणे,प्रत्येक कर्जावेळी घेतला जाणारा इमारत निधी बंद करणे हे पतसंस्थेची भविष्यातील योजना व धोरण आहे
अल्प कालावधीतच पतसंस्थेचे अध्यक्ष दिपक अकोटकार,उपाध्यक्ष रमेश कडू,सचिन नंदकिशोर ढाकरे,संचालिका रजनी धारपवार,विजया नरवाडे, स्वाती कात्रे,संचालक राधाकृष्ण तालोट,गोवर्धन गवई, प्रशांत उगले,सुरेश डोसे,गोविंद गायकी,श्रीकांत झनके,वासुदेव राठोड यांनी सभासद हिताचे निर्णय घेतलेले आहेत आणि भविष्यातही सभासद हितासाठी अनेक निर्णय घेण्यासाठी संपुर्ण संचालक मंडळ कटिबद्ध आहे.