शेगांव :
पंचायत समिती शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित शेगांव र.न.९५३ च्या मयत झालेल्या सभासदांचे संपुर्ण कर्ज माफ व पाच लाखाचे संरक्षण कवच देण्याची मागणी अध्यक्ष दिपक अकोटकार,उपाध्यक्ष रमेश कडू,सचिव नंदकिशोर ढाकरे,संचालिका रजनी धारपवार,विजया नरवाडे, स्वाती कात्रे,संचालक राधाकृष्ण तालोट,गोवर्धन गवई, प्रशांत उगले,सुरेश डोसे,गोविंद गायकी,श्रीकांत झनके,वासुदेव राठोड या संचालक मंडळाकडे निवेदनामार्फत पतसंस्थेच्या सभासदांनी केली आहे.
एखाद्या सभासदाचा दुर्दैवाने अपघाती अथवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास सभासदाच्या कुटुंबाकडून संपुर्ण कर्ज वसुली करण्यात येते परंतू ७ ऑगष्ट रोजी संपन्न होणा-या शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सदर उपविधीची दुरूस्ती करून संपुर्ण कर्ज माफीसह पाच लाख रूपयाचे संरक्षण कवच देऊन सभासदांचे हित जोपासावे व सभासदाच्या कुटुंबियांना भरीव अर्थ सहाय्य पतसंस्थेच्यावतीने करण्यात यावे या विषयासंदर्भात प्रहार शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनिल घावट यांच्याशी चर्चा सभासदांनी केली.
याप्रसंगी नवल पहुरकर,सुभाष जाधव,श्रीकृष्ण न्याहाटकर, संकेत जोशी,राहुल वैराळकर, सुनिल बस्सी,गजानन खोंड,सतिष सोंडे, मनीष पहुरकर, ज्ञानेश्वर ताठे, रविनाथ रणमले, सतीश लाटे,विनोद ठाकरे, ज्ञानेश्वर बाजारे, सिद्धार्थ शिरसाट, शिवाजी मोरे,कैलास डेकाटे,वसंत बारापात्रे,प्रमोद सुसर,प्रदीप डाबेराव, दत्तात्रेय रेवस्कर, दिलीप बळी, सचिन वडाळ आदी शिक्षक उपस्थित होते.