वरूण चक्रवर्ती ते वॉरियर आणि अमित मिश्रापर्यंत कसा पसरला कोरोना

corona in ipl: इंडियन प्रीमियर लीगमध्ये कोरोनाची एंट्री कशी झाली असा सवाल सध्या आयोजकांना पडला आहे. बायोबबलसारखी सेफ्टी असतानाही खेळाडूंना कोरोनाची लागण झाली कशी?

0 39

मुंबई: वरूण चक्रवर्ती ते संदीप वॉरियर आणि अमित मिश्रापर्यंत कोविड १९ची(Corona) एंट्री आयपीएलच्या (IPL) कँपमध्ये झाली आहे. सोशल डिस्टन्सिंगबाबत बीसीसीआयच्या प्रोटोकॉलचे काही मर्यादेपर्यंत उल्लंघन झाले ज्याचा परिणाम समोर आला. फ्रेंचायजींनी जीपीएस ट्रॅकिंगमध्ये बिघाड असल्याचे सांगितले ज्यामुळे टीम आणि बोर्ड आता मॅन्युअली तपास करण्यासा प्रयत्न करता आहेत की अखेर आयपीएलच्या बबलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला तरी कसा.

चक्रवर्तीला गेल्या आठवड्यात हॉस्पिटलला न्यावे लागले होते. दरम्यान, अधिकृत माहितीनुसार त्याला खांद्याची तपासणी करण्यासाठी नेण्यात येणार होते मात्र प्रकरण जवळून माहीत असलेल्या लोकांचे म्हणणे आहे की गोलंदाजाच्या पोटात सूज होती. यानंतर अहमदाबादमध्ये परत आल्यावर टीम हॉटेलमध्ये त्याने संदीप वॉरियरसोबत १ मेला जेवण केले.

दोन्ही खेळाडू यानंतर संघासोबत सरावासाठी गेले जिथे चक्रवर्तीने तब्येत खराब असल्याची तक्रार केली. तेथे त्याला एका रूममध्ये आयसोलेट केले आणि वॉरियर सरावासाठी गेला. तेथे दिल्ली कॅपिटल्सचाही सराव सुरू होता.

बीसीसीआयचे म्हणणे आहे की या बबलमध्ये भगदाड पडले. दिल्ली कॅपिटल्स(Delhi Capitals) आणि केकेआरचे सराव सत्र एकाच वेळेस सुरू होते. वॉरियरने लेग स्पिनर अमित मिश्राची भेट घेतली आणि दोघांमध्ये बातचीत झाली. यानंतर ते आपापल्या हॉटेलमध्ये गेले.

मिश्रा संघ सरावानंतर टीम हॉटेलमध्ये आला आणि त्याने तब्येत ठीक नसल्याची तक्रार केली. त्यालाही आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले. त्यानंतर त्याची तपासणी करण्यात आली. फ्रेंचायजीने यानंतर दररोज तपासणी सुरू केली ज्यामुळे समजेल की संघात आणखी कोणाला कोरोनाची लागण झाली आहे का? दरम्यान, कँपच्या बाकी सदस्यांच्या टेस्ट निगेटिव्ह आल्या.

सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

तीन वेगळ्या संघातील चार खेळाडू कोरोनाबाधित आढळल्याने बीसीसीआयने आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडतो

Leave A Reply

Your email address will not be published.