जयंत पाटीलांच्या सभेत, सातारच्या सभेची पुनरावृत्ती वरूनराजाने लावली हजेरी; अन् पाटील म्हणाले..

0 0

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार भगीरथ भारत नाना भालके विरुद्ध भाजपचे उमेदवार समाधान आवताडे अशी चुरशीची लढत पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर काल (ता. ११) रोजी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज मंगळवेढ्यात सभा घेतली.

पण या सभेत अचानक पाऊस सुरू होताच जयंत पाटील हे भरपावसात भिजले. त्यामुळे पुन्हा एकदा सातारामधील शरद पवारसाहेबांच्या पावसातील त्या सभेची आठवण यावेळी पंढरपूरकरांना झाली. तसेच जयंत पाटील यांनी या संबंधी एक ट्विट सुद्धा केले आहे.

पाटीलांनी आपल्या ट्विटमध्ये म्हणले आहे की, “पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात पोटनिवडणूकीनिमित्ताने भगिरथ भारत नाना भालके यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. सभास्थळी वरुणराजाने हजेरी लावली होती. वरुणराजासह मंगळवेढ्यातील जनतेचा उत्साह ही शिगेला पोहोचला होता.”

मंगळवेढ्याला जास्तीतजास्त पाणी मिळावे यासाठी भारत नाना भालके २००९ पासून पाठपुरावा करत होते. भाजपसरकारच्या काळात या मतदारसंघाचे पाणी गायब केले गेले. आपले सरकार आले त्यावेळी मला मंत्री केले नाही तरी चालेल पण माझ्या मतदारसंघाला पाणी द्या अशी भूमिका घेतली होती याची आठवण करून दिली.

योगायोगाने जलसंपदा मंत्री झाल्यावर आणि आचारसंहिता लागण्याआधीच आपल्या तालुक्याला दोन टीएमसी पाणी देण्याचा निर्णय घेतला. इथल्या खासदारांनी गाव दत्तक घेतले मात्र ते कधीच फिरकले नाहीत. परंतु भगीरथ भालके यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील २४ गावांना सुजलाम सुफलाम करण्याचा मानस असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

सत्ता गेल्यामुळे भाजपच्या लोकांना वेड लागले आहे. पाण्याविना मासा तडफडतो तशी भाजपची परिस्थिती झाली आहे. या लोकांकडे दुर्लक्ष करून भगीरथ भालके यांना विजयी करा, भारत नानांचा हा मुलगा आदरणीय पवारसाहेबांच्या आशिर्वादाने या मतदारसंघासाठी आधुनिक भगीरथ ठरेल असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

दरम्यान, यापूर्वी भागीरथ भारत नाना भालके यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे या मतदारसंघात आले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.