हृदय पिळवरून टाकणारी घटना! एकाच वेळी २३ मृत कोरोना रुग्णांवर करण्यात आले अंत्यसंस्कार

0 0

प्रतिनिधी:- निवास गायकवाड
उस्मानाबाद : कोरोनाने सर्वत्र हाहाकार माजवलेला आहे. अशातच महाराष्ट्रात संचारबंदी लागून सुद्धा कोरोना आपले हातपाय पसरतच आहे. अशातच आता उस्मानाबाद मध्ये एक हृदय पिळवटून टाकणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उस्मानाबाद शहरातील कपील धरा समशान भूमीत एकाचवेळी कोरोनाने मृत्यू झालेल्या २३ मृतांवर अंत्यससंस्कार करण्यात आले आहेत.

उस्मानाबादमध्ये कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट बनत चालली आहे. आज तब्बल ७६४ कोरोनाबाधित रुग्णांवर उस्मानाबादमध्ये उपचार सुरू आहेत. पण याअगोदर १ महिन्यापूर्वी हीच आकडेवारी शंभराच्या घरात होती. उस्मानाबादमध्ये तब्बल २३ जणांवर एकाच वेळी एकाच ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्काराची दृश्य पाहून कोणाच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.

दरम्यान, जिवंत असताना रुग्णालयात उपचारासाठी रांगेत उभं राहायचं आणि प्राण गेल्यानंतरही अंत्यसंस्कारासाठी रांगेत उभं राहायचं असंच काहीसं चित्र गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.