मंदिराचे बांधकाम सुरू झाल्यानंतरची पहिली राम नवमी:कोरोनामुळे यंदा अयोध्येत जल्लोष नाही, सीमाबंदी असेल; निगेटिव्ह रिपोर्ट आल्यानंतरच मिळणार मंदिरात प्रवेश

जे भाविक कोविड 19 चा निगेटिव्ह रिपोर्ट घेऊन येतील, त्यांनाच मंदिरात प्रवेश दिला जाईल.

0 6

राम नवमीचा सण दरवर्षी मोठ्या जल्लोषात उत्साहात साजरा केला जातो. यंदा राम नवमी 21 एप्रिलला येत आहे. अयोध्येत राम मंदिराचे बांधकाम सुरु झाल्यानंतरही ही पहिली राम नवमी आहे. पण यंदा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भाविकांच्या आनंदावर विरजण पडले आहे. गेल्या 24 तासांत अयोध्येत एकूण 200 संक्रमित लोक सापडले आहेत. आता येथे एकूण रुग्णांची संख्या 1311 वर पोहोचली आहे.

यंदा राम नवमी भाविकांशिवाय मंदिरात केवळ पूजा अर्चापर्यंत मर्यादित राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मागीलवर्षी 2020 मध्येही, लॉकडाऊनमुळे राम नवमीचे कार्यक्रम होऊ शकले नव्हते. हे सलग दुसरे वर्ष असेल जेव्हा अयोध्येत राम नवमीचा भव्य उत्सव होणार नाही. राम मंदिराचे पुजारी सत्येंद्र दास म्हणतात, ‘खूप मर्यादित लोक श्रीरामाच्या दर्शनासाठी येथे येत आहेत. आणि त्यांना 5-5 च्या तुकड्यांमध्ये प्रवेश दिला जात आहे. सामाजिक अंतर आणि मास्क लावणे अनिवार्य आहे. अशा परिस्थितीत राम नवमीचा उत्सव केवळ औपचारिकपणे साजरा केला जाईल.’

अयोध्येत कोरोनाची प्रकरणे सतत वाढत आहेत. यासंदर्भात आता कडक तयारी केली जात आहे.
                                         अयोध्येत कोरोनाची प्रकरणे सतत वाढत आहेत. यासंदर्भात आता कडक तयारी केली जात आहे.

राम नवमीविषयी महंत राज कुमार दास म्हणतात की, ‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करून लोकांनी त्यांच्या घरातच राहून राम नवमीचा सण साजरा करावा.’ जिथे श्रीरामाची पूजाअर्चा असेल, तिथेच अयोध्या आहे, असे आवाहन महंत मैथिली शरण यांनी केले आहे.

अयोध्याचे एसएसपी शैलेश पांडे म्हणाले की, जे भाविक कोविड 19 चा निगेटिव्ह रिपोर्ट घेऊन येतील, त्यांनाच मंदिरात प्रवेश दिला जाईल. प्रशासकीय अधिका-यांच्या म्हणण्यानुसार राम नवमीच्या अगोदर सर्वप्रथम तपासणीचे काम हाती घेण्यात येणार असून अयोध्याच्या सीमांवर बंदी घातली जाईल.

राम मंदिरांचे बांधकाम सुरु झाल्यानंतर आखण्यात आलेल्या योजनांवरही कोरोनाचा परिणाम

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्या लोकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत, त्यांनाच मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे.
                        कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्या लोकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत, त्यांनाच मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे.

राम मंदिराचे बांधकाम सुरू झाल्यानंतर अयोध्याला पर्यटनाच्या नकाशावर ठेवण्यासाठी सरकारने अनेक योजना सुरू केल्या, परंतु कोरोनामुळे त्या सर्वांवर परिणाम झाला आहे. 2022 च्या विधानसभा निवडणुका जवळ आल्यामुळे काही योजनांवर वेगाने काम सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ज्या योजना चालू आहेत त्यामध्ये अयोध्या बस स्थानक, कोरियन क्वीन्स पार्क, एनएच 27 चा सहापदरी महामार्ग, अयोध्याभोवती रिंगरोडचे बांधकाम, अयोध्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे बांधकाम, सुमारे 1200 एकर परिसरात नवीन अयोध्ये चेबांधकाम अशा अनेक प्रकल्पांचा समावेश आहे.

त्यापैकी काही प्रकल्प पूर्ण होत आले आहेत, तर काहींवर काम सुरू झाले आहे. काही प्रकल्पांवर अद्याप काम सुरु व्हायचे आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी अयोध्येत सुमारे अर्धा डझन महामार्ग बांधण्याची घोषणा केली. त्यांच्यावरील काम अद्याप सुरू झालेले नाही.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी रस्त्यांवर सॅनिटाइजेशनचे कामे करणारे पोलिस कर्मचारी.
                                                   कोरोना संसर्ग रोखण्यासाठी रस्त्यांवर सॅनिटाइजेशनचे कामे करणारे पोलिस कर्मचारी.

सर्वात उंच पुतळ्याचा प्रकल्प अद्याप सुरू होऊ शकला नाही
251 मीटरची प्रभू श्रीरामाच्या जगातील सर्वात उंच प्रतिमेच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे काम अद्याप सुरू झालेले नाही. दीपोत्सवानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 4 वर्षांपूर्वी याची घोषणा केली होती. गेल्या 2 वर्षात अयोध्येत बर्‍याच विकास योजना सुरू झाल्या आहेत, परंतु त्यापैकी ब-याच थंड बस्त्यात आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.