आंदोलनाला हिंसक वळण:बांगलादेशात कट्टरवादी धर्मगुरूस अटक; तणाव

हेफाजत-ए-इस्लामचे सरचिटणीस मामूनूल हक असे अटकेतील धर्मगुरूचे नाव आहे

0 1

बांगलादेशमध्ये कट्टरवादी गटाच्या धर्मगुरूस अटक करण्यात आली आहे. एका आंदोलनाला हिंसक वळण मिळाल्याने सरकारने ही कारवाई केल्याचे मानले जाते. हेफाजत-ए-इस्लामचे सरचिटणीस मामूनूल हक असे अटकेतील धर्मगुरूचे नाव आहे. पाेलिसांनी या संघटनेच्या कार्यालयावर छापे टाकले हाेते. त्याच्या निषेधार्थ त्यांच्या समर्थकांनी तीव्र निषेध केला. निदर्शक हिंसक झाले हाेते.

ढाक्यातील महानगर पाेलिस उपायुक्त हरुन-उर-रशीद म्हणाले, हक आणि हेफाजत संघटनेच्या इतर नेत्यांवर अनेक प्रकारच्या कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले.

ढाेलैपार येथे गेल्या महिन्यात बंगबंधू शेख मुजिबूर रहेमान यांचा पुतळा बसवण्यास या संघटनेने तीव्र विराेध केला हाेता. पुतळा बसवण्याचे काम तत्काळ थांबवण्याची मागणी या संघटनेने केली हाेती. गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या दाैऱ्यावेळी देखील हेफाजतच्या समर्थकांनी जाेरदार निदर्शने केली हाेती. तेव्हाही समर्थक आणि सुरक्षा दल यांच्यात संघर्ष उडाला हाेता. त्यात डझनावर लाेक जखमी झाले हाेते. काही निदर्शकांचा धुमश्चक्रीत मृत्यूही झाला हाेता.

पोलिस स्थानकांची नासधूस
हेफाजतच्या समर्थकांनी परिसरातील अनेक पाेलिस ठाणी आणि पाेलिसांवर जाेरदार हल्लाबाेल केला. तेथील सरकारी मालमत्तेचेही नुकसान केले. या सर्व प्रकरणांचाही कसून तपास केला जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.