IND vs SL : धवन सेना श्रीलंका दौऱ्यासाठी सज्ज, लवकरच रवाना होणार, बीसीसीआयने शेअर केला दमदार फोटो

भारताचे वरीष्ठ क्रिकेटपटू वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये पराभूत झाले. या पराभवानंतर आता युवा भारतीय क्रिकेटपटू असणारी भारतीय टीम श्रीलंका दौऱ्यासाठी सज्ज झाली आहे.

0 28

मुंबई : श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाची (India tour of Sri Lanka) IND vs SLघोषणा करण्यात आली आहे. श्रीलंका दौऱ्यासाठी बीसीसीआयने भारताचा दिग्गज खेळाडू शिखर धवन (Shikhar Dhawan) याला कर्णधारपदाची तर भुवनेश्वर कुमारला (Bhuvneshwar Kumar) उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे. तसेच माजी खेळाडू राहुल द्राविडला (Rahul Dravid) मुख्य प्रशिक्षक पदाचा भार सोपवण्यात आला आहे. सोबतच ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad), चेतन सकारीया (Chetan sakariya), देवदत्त पडीक्कल (Devdutt padikkal) अशा बऱ्याच नव्या दमाच्या भारतीय खेळाडूंनाही संधी देण्यात आली आहे. त्यामुळे हा दौरा अत्यंत उत्कंटावर्धक असणार अशी आशा क्रिकेटप्रेमी व्यक्त करत आहेत. (BCCI Shares A Photo of the Team touring Sri Lanka)

खेळाडूंसह बीसीसीआयने 18 सदस्यीय सपोर्ट स्टाफची नावंही जाहिर केली आहेत. तसेच यंदा दोन निवडकर्ते देखील संघासोबत या दौऱ्यावर जाणार आहेत. भारताचे माजी क्रिकेटपटू देबाशीष मोहंती आणि अबे कुरवीला अशी या दोघांची नावे असून ते देखील संघासोबत दौऱ्यावर जाणार आहेत. त सपोर्ट स्टाफमध्ये राहुल द्रविड (मुख्य प्रशिक्षक), सुधीर असनानी (मॅनेजर), पारस म्हांब्रे (गोलंदाजी प्रशिक्षक), टी दिलीप (फील्डिंग प्रशिक्षक), आशीष कौशिक (फिजियो), निरंजन पंडित (फिजियो), आनंद दाते (ट्रेनर), अल हर्षा (ट्रेनर), अशोक साध (थ्रोडाउन विशेषज्ञ), सौरव अंबाडकर (थ्रोडाउन विशेषज्ञ), सुमित मलापुर्कर (लॉजिस्टिक मॅनेजर), आनंद सुब्रामण्यम (मीडिया मॅनेजर), अमेया तिलक (कंटेंट प्रोड्यूसर), अभिजीत साल्वी (टीम डॉक्टर), रविंद्र ढोलपुरे (सिक्यॉरिटी ऑफिसर), नंदन माझी (मसाज), मंगेश गायकवाड़ (मसाज), एल वरुण (अॅनलिस्ट) यांची नावे आहेत. या सर्व भारतीय क्रिकेट संघाचा एक धांसू फोटो बीसीसीआयने शेअर केला आहे.

भारताचा श्रीलंका दौरा

टीम इंडिया श्रीलंकेच्या दौऱ्यात तीन वनडे आणि तीन ट्वेन्टी-20 सामने खेळणार आहे. हे सर्व सामने कोलंबोमधील आर. प्रेमदासा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहेत. यात पहिला एकदिवसीय सामना 13 जुलै, दुसरा 16 जुलै आणि तिसरा 18 जुलैला खेळवला जाणार आहे. तर पहिला टी-20 सामना 21 जुलै, दुसरा 23 जुलै आणि तिसरा 25 जुलैला खेळवला जाईल.

भारतीय संघ : शिखर धवन (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडीक्कल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नितीष राणा, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), युजवेंद्र चहल, राहुल चहर, के. गौतम, कृणाल पंड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, दीपक चाहर, नवदीप सैनी, चेतन साकरिया.

Leave A Reply

Your email address will not be published.