सायकल चोर ‘जादू’ला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांकडे दिली धक्कादायक कबुली!

सदर आरोपीला न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

0 4

हायलाइट्स:

  • सायकल चोराला पोलिसांनी घेतलं ताब्यात
  • चौकशीदरम्यान धक्कादायक कबुली
  • शहरात चोरल्या तब्बल ३५ सायकली

यवतमाळ: शहरातील एका सायकल चोराला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर चौकशीदरम्यान त्याने पोलिसांकडे धक्कादायक कबुली दिली आहे. या चोरट्याने तब्बल ३५ सायकल चोरी केल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली आहे. या प्रकरणात पोलिसांनी चोरी करण्यात आलेल्या सायकली जप्त करण्यास सुरुवात केली असून अनेक सायकली ताब्यात घेतल्या आहे.

सुरेश उर्फ जादू मलांडे (वय १९ वर्ष रा. पारवा, यवतमाळ) असं या अ‌ट्टल चोरट्याचं नाव आहे. सदर आरोपीला न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

यवतमाळ शहरात मोठ्या प्रमाणात महागड्या सायकल चोरीच्या घटना घडल्या आहे. या वाढत्या घटना लक्षात घेता अवधुतवाडी डीबी पथकाने जादू नामक सराईत सायकल चोराला दोन दिवसापूर्वी ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर पोलिसांनी त्याची सखोल चौकशी सुरू केली केली होती. या चौकशीत त्याने तब्बल ३५ सायकली शहरातून लंपास केल्याची कबुली पोलिसांसमोर दिली. दरम्यान डीबी पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सायकली कुठून चोरी केल्या, कोणाला विकल्या याची विचारपूस सुरू केली असून काही सायकली शहरासह इतर भागातून जप्त करण्यात आल्या आहेत.

ही कारवाई अवधुतवाडी ठाणेदार मनोज केदारे यांच्या नेतृत्वाखाली डीबी पथकाचे प्रमुख पोलिस उपनिरीक्षक राहुल गुहे, पथकातील सुरेश मेश्राम, गजानन वाटमोडे, गजानन दुधकोहळे, अश्विन पवार, समाधान कांबळे, बबलू पठाण, सागर चिरडे यांनी पार पाडली असून पुढील तपास पोलिस करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.