“अनिल परब यांनी किमान उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या जनतेला दिलेल्या शब्दाचा तरी मान राखावा”

“…म्हणूनच शरद पवारांना एसटी कामगारांसोबत चर्चा करण्यास भाग पाडलं” "अनिल परब यांनी किमान उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या जनतेला दिलेल्या शब्दाचा तरी मान राखावा"

0

एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ जाहीर केल्यानंतरही दोन महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचा संप सुरूच राहिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सोमवारी परिवहनमंत्री अनिल परब यांच्यासह एसटी संघटनांच्या नेत्यांची बैठक घेतली़ कामावर हजर झाल्यास कोणतीही कारवाई केली जाणार नाही, अशी ग्वाही परब यांनी दिली, तर किती ताणायचे याचा तारतम्याने विचार करण्याची गरज असून, एसटी सेवा पूर्वपदावर आणण्याचे आवाहन पवार यांनी केल़े ही चर्चा सकारात्मक झाल्याने एसटी संपाबाबत तोडगा निघण्याचे संकेत आहेत.

दरम्यान भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांशी चर्चा करण्याचं आवाहन केलं आहे. तसंच महसुलात घट झाल्यानेच शरद पवार चर्चा करण्यास भाग पडले असा दावा केला. ते म्हणाले की, “एसटी कर्मचाऱ्यांनी एकजुटीने लढा दिला यासाठी मी अभिनंदन करतो. कोणत्याही युनिअनची सभासद फी भरली नाही, महसुलात घट आणली त्यामुळेच शरद पवारांना तुमच्यासोबत चर्चा करण्यास भाग पाडलं”.

कामावर आल्यास कारवाई नाही ! ; संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना सरकारची ग्वाही, तोडग्यासाठी पवारांचा पुढाकार

“अनिल परब यांना विनंती करायची की आपण हा प्रश्न मार्गी लागावा म्हणून सगळे दरवाजे ठोठावत आहात, त्यापेक्षा स्वत: आझाद मैदानात जाऊन आपल्याच मराठी एसटी कर्मचाऱ्यांशी चर्चा का करत नाही?,” असा सवाल गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केला.

“अनिल परब यांनी स्वत: भेटावं आणि ठामपणे आश्वासित करावं की बडतर्फीची कार्यवाही मागे घेण्यात येईल, जेणेकरुन चर्चेचा मार्ग मोकळा होईल. तसंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होतेच की मी माझ्या मंत्र्यांना स्वतः मोर्चाला समोरे जाण्यास सांगेल. माझ्या विनंतीचा नाही तर किमान उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या जनतेला दिलेल्या शब्दाचा तरी मान राखा आणि दोन पावलं पुढे जाऊन आपुलकीने त्यांची समजूत काढा, चर्चा करा आणि यावर तोडगा काढा,” अशी मागणी पडळकर यांनी केली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.