संजय गायकवाडांच्या विधानाला भाजपचे प्रतिउत्तर! म्हणाले; “जंतू पार्सल पाठवतो मातोश्रीवर, कुठे घालायची तिथे घाल”

0 7

प्रतिनिधी:- निवास गायकवाड
मुंबई : बुलडाणा येथील शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केले होते. मात्र आता संजय गायकवाड यांना भाजप आमदार नितेश राणे यांनी देखील चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे. नितेश राणे यांनी गायकवाड यांना तो प्रयोग प्रथम मुख्यमंत्र्यांवर कर, अशा प्रकारचे प्रत्युत्तर दिले आहे.

“मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते, तर मी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबून टाकले असते, असे वादग्रस्त वक्तव्य शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केले होते. मात्र आता याला भाजप नेते नितेश राणेंनी प्रतिउत्तर दिले आहे.

नितेश राणे म्हणाले की, “देवेंद्रजींच्या जवळ जाणं हे तर लांब राहिलं. हे या गायकवाडला कोण सांगेल. पहिला प्रयोग तुझ्या घरकोंबडा मुख्यमंत्र्यावर कर आणि मग बाकीचे बघू, जंतू पार्सल पाठवतो मातोश्रीवर, कुठे घालायची तिथे घाल.” अशा आशयाचे ट्विट करत नितेश राणेंनी आमदार संजय गायकवाड सह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सुद्धा निशाण साधला आहे.

दरम्यान, केंद्रातील भाजपने राज्य सरकारला मदत करायचं सोडून बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळला मदत केली आहे. गुजरातला इंजेक्शन मोफत वाटले. असा आरोप आमदार संजय गायकवाड यांनी केला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.