औरंगाबादजवळ भर रस्त्यात रुग्णवाहिकेला आग, ऑक्सिजन सिलिंडरच्या स्फोटाने हादरला परिसर

Ambulance ने पेट घेतल्यानंतर गाडीतील ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट झाला. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.

0 0

औरंगाबाद  : वाळूज परिसरात धावत्या रुग्णावाहिकेला आग लागल्याचा प्रकार घडला. शॉर्टसर्किटमुळं ही आग लागली. चालक आणि डॉक्टर वेळीच खाली उतरल्याने काही हानी झाली नाही. मात्र काही वेळानं गाडीनं पेट घेतल्यानंतर गाडीतील ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट झाल्यानं एखाद्या सिनेमात दाखवतात तसा स्फोट झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.

ही रुग्णवाहिका गंगापूर तालुक्यात असलेल्या भेंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राची होती. वाळूजलगतच्या एका पेट्रोल पंपाकडं इंधन भरण्यासाठी ही रुग्णवाहिका जात होती. गाडीत चालक सचिन कराळेसह डॉ. प्रशांत पंडुरे हे होते. अचानक ड्रायव्हरला गाडीच्या मागच्या बाजुने धूर निघत असल्याचं लक्षात आलं. ड्रायव्हरनं वेळीच रुग्णवाहिका रस्त्याच्या कडेला थांबवली आणि दोघेही खाली उतरले. त्याचवेळी रुग्णवाहिकेने पेट घेतला. रुग्णवाहिकेच्या मागच्या बाजुला ठेवलेल्या इनव्हर्टर आणि बॅटरीमुळं शॉर्ट सर्किट होऊन ही आग लागली होती.

रुग्णवाहिकेने चांगलीच आग पकडली होती. त्यावेळी अग्निशमन दलाचा बंब त्याठिकाणी दाखल झाला. मात्र त्यांनी गाडीवर पाणी मारण्यास सुरुवात करताच एक मोठा स्फोट झाला. अगदी चित्रपटात दाखवतात तसा हा स्फोट होता. आगीमुळं रुग्णवाहिकेतील ऑक्सिजन सिलिंडर गरम होऊन त्याचा स्फोट झाला होता. स्फोट झाल्यानं रुग्णवाहिकेचा पत्रा जवळपास हवेत 50 फूट वर उडाला. सुदैवानं यात कोणाला हानी झाली नाही. कोरोना रुग्णांला आणण्यासाठी ही रुग्णवाहिका निघाली होती. मात्र त्याआधी ते डिझेस भरायला जात होते. जर रुग्णाला घेऊन येताना हा अपघात घडला असता तर दुर्दैवी घटना घडण्याची शक्यता होती. मात्र सुदैवानं तसं झालं नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.