रक्त दान श्रेष्ठ दान | डॉ.सतीशभाऊ वारजूकर जि. प.गट नेते चंद्रपूर यांच्या शुभ हस्ते उदघाटन संपन्न

0 26

लोकमत रक्ताचं नात व पंचायत समिती चिमूर यांचे आयोजन

 

चिमूर: देशभरात गेल्या दोन वर्षापासून कोरोना महामारी आल्याने कित्येक कुटुंब उदवस्त झाले ,कित्येक मूल आई वडिलांन पासून पोरके झाले ,कारण या महामारीत पैसा असून तो सुद्धा कामात पडला नाही ,दवाखान्यात पेशंट ची संख्या वाढल्याने कुणाला बेड मिडणे मुश्किल झाले होते,बेड न मिळ्याल्याने कित्येक लोक दवाखान्याबाहेरच मृत्यू मुखी पडले आणि अशातच आता मात्र,नवीन महामारी कोरोना डेल्टा प्लस व्हेरीयंट आल्याने पुन्हा नागरिकांना कसल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून तशा वेवस्था करण्यात आल्या ,परंतु रक्ताचं मात्र तुटवडा मोठ्या प्रमाणात आहे कारण आपल्या लागणाऱ्या प्रत्येक वस्तूचे कारखाने,तयार आहेत परंतु रक्त मात्र मांनसाद्वारे तयार होत असतो म्हणून कोरोना पिडीत ताथा डेल्टा प्लस व्हेरीयंट रुग्णांना आवश्यक पुरवठा व्हावा या हेतूने रक्तदान शिबीर आयोजित करून गरजवंताचे प्राण वाचवता यावे या दृष्टीने पंचायत समिती चिमूर तथा महाराष्ट्र राज्य ग्राम सेवक युनियन शाखा चिमूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि.१४.७.२०२१ रोज बुधवारला रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे उदघाटन चंद्रपूर जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष गट नेता डॉ.सतीशभाऊ वारजूकर,यांच्या हस्ते पार पडले, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चिमूर पंचायत समिती सभापती लताताई पिसे प्रमुख अतिथी म्हणून,जि. प.सदस्य गजानन बुटके,माजी उपसभापती शांतारामजी सेलवटकर,पं. स.सदस्य भावनाताई बावनकर,गट विकास अधिकारी धनंजयजी साळवे साहेब,प्रमुख पाहुणे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मेश्राम साहेब ,गटशिक्षणाधिकारी पं. स.चिमूर मेश्राम साहेब ,महिला व बाल कल्याण विकास अधीकारी मडावी मॅडम, सचिव संघटना तालुका कार्यकारिणी अध्यक्ष ढवरे मॅडम,व लोकमत रक्ताचं नात या संगटनेचे पदाधिकारी व कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक,आमोदभाऊ गौरकर,राजकुमारजी चुणारकर,पाटील साहेब,डॉ.पवार साहेब,डॉ.गावित ,व ग्रामसेवक व पंचायत समिती पदाधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.