BSNLच्या ‘या’ प्लानपुढे Airtel, Jio आणि Vi फेल, पाहा वैधता आणि बेनिफिट्स

Airtel, Jio, Vi आणि BSNL या चारही टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना ३९९ रुपयांचा प्लान ऑफर करत आहे. मात्र, यात बीएसएनएलच्या प्लानमध्ये अधिक बेनिफिट्स ग्राहकांना मिळतात.

0 58

हायलाइट्स:

  • BSNL च्या ३९९ रुपयांच्या प्लानची वैधता ८० दिवस.
  • Airtel, Jio, Vi च्या याच किंमतीतील प्लानची वैधता केवळ ५६ दिवस आहे.
  • BSNL च्या प्लानमध्ये दररोज १ जीबी हाय स्पीड डेटा मिळेल.

नवी दिल्ली :Airtel, Jio, Vi आणि BSNL चारही टेलिकॉम कंपन्या आपल्या ग्राहकांना कमी किंमतीत अनेक दमदार प्लान्स ऑफर करतात असतात. या चारही कंपन्या ग्राहकांना ३९९ रुपयांचा प्लान ऑफर करत आहे. यात अनलिमिटेड सुविधा मिळण्याचा दावा केला जातो. मात्र, यातील सर्वोत्तम कोणता आहे हे पाहणे महत्त्वाचे आहे. या चारही कंपन्यांच्या ३९९ रुपयांच्या प्लानविषयी जाणून घेऊया. यामुळे तुम्हाला सर्वोत्त प्लान निवडण्यास मदत होईल.

Vi चा ३९९ रुपयांचा प्लान

या प्लानची वैधता ५६ दिवस असून, यात दररोज १.५ जीबी डेटा आणि १०० एसएमएसची सुविधा मिळते. प्लानमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग करता येईल. सोबतच, यात Binge All Night ची सुविधा देखील मिळते, यात रात्री १२ ते सकाळी ६ पर्यंत अनलिमिटेड इंटरनेट वापरता येईल. या व्यतिरिक्त विकेंड डेटा रोल ओव्हर आणि Vi movies and TV चे मोफत स्बस्क्रिप्शन मिळेल.

Airtel चा ३९९ रुपयांचा प्लान

एअरटेलच्या या प्लानची वैधता ५६ दिवस असून, यात दररोज १.५ जीबी डेटा, १०० एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळेल. यात Airtel Thanks चे बेनिफिट्स मिळतील. सोबतच, ३० दिवसांसाठी Amazon Prime Video Mobile Edition चे मोफत स्बस्क्रिप्शन, एअरटेल एक्स्ट्रिम, तीन महिन्यांसाठी Apollo 24|7 Circle, Wynk Music आणि वर्षभरासाठी Shaw Academy च्या मोफत ऑनलाइन कोर्सची सुविधा मिळते.

Reliance Jio चा ३९९ रुपयांचा प्लान

या प्लानमध्ये देखील दररोज १.५ जीबी हाय स्पीड डेटा, १०० एसएमएस आणि कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळेल. डेटा समाप्त झाल्यानंतर ६४ Kbps ने इंटरनेट वापरता येईल. या प्लानची वैधता ५६ दिवस असून, यात JioSecurity, JioCloud, JioCinema आणि JioNews सारख्या जिओ  अॅप्सचे मोफत स्बस्क्रिप्शन मिळेल.

BSNL चा ३९९ रुपयांचा प्लान

बीएसएनएलच्या या प्लानची वैधता सर्वाधिक आहे. यात एकूण ८० दिवसांसाठी दररोज १ जीबी हाय स्पीड डेटा मिळेल. हा डेटा समाप्त झाल्यानंतर ८० Kbps स्पीडने इंटरनेट वापरता येईल. या प्लानमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळेल.

Leave A Reply

Your email address will not be published.