बुलडाणा : गुटख्यासह विदेशी दारु जप्त

बुलडाणा : खामगाव ग्रामीण पाेलीस स्टेशनच्या हद्दीत सुरू स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १२ एप्रिल राेजी धाड टाकून अवैध गुटखा ...

0 0

बुलडाणा : खामगाव ग्रामीण पाेलीस स्टेशनच्या हद्दीत सुरू स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १२ एप्रिल राेजी धाड टाकून अवैध गुटखा व विदेशी दारु जप्त केली.

कंझारा फाट्यावर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पॅट्रोलिंग करीत असताना गुटख्याची दुचाकीवरून वाहतूक हाेत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने शेख कादिर शेख गुलामी व शेख शकिर शेख कादिर दाेघेही रा. कंझारा ता. खामगाव यांना अटक केली. त्यांच्याकडून २८ हजार ६१६ रुपयांचा गुटखा व दुचाकी, माेबाईल असा ९८ हजार ६१६ रुपयांचा एवज जप्त केला. या प्रकरणी दाेन्ही आराेपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विदेशी दारूची अवैध विक्री करणाऱ्या सोनू लक्ष्मणसिंह ठाकूर रा. सतिफैल खामगाव यास पथकाने अटक करून त्याच्याकडून ३ हजार ६५० रुपयांचा एवज जप्त केला. आराेपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास खामगाव ग्रामीण पाेलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पाेलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अपर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गीते यांच्या आदेशावरून सपोनि चतरकर, रघुनाथ जाधव, गजानन अहेर, दीपक पवार, चालक संजय मिसाळ यांच्या पथकाने केली.

देऊळगावराजात दारू जप्त देऊळगावराजा पाेलीस स्टेशनच्या हद्दीत देशी व विदेशी दारूची विक्री करणाऱ्या मोहसीन खान मंजूर खान यास गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून देशी व विदेशी दारूचा २५ हजार ९४० रुपयांचा ऐवज जप्त केला. आराेपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पीएसआय नीलेश शेळके, श्रीकांत जिंदमवार, साजिद शेख, विलास काकड, श्रीकृष्ण चांदूरकर, नदिम शेख व इतरांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.