बुलडाणा : जिल्ह्यात तीन दिवस पुरेल एवढाच ऑक्सिजन साठा!

0 0

बुलडाणा : जिल्ह्यातील सर्वच गंभीर रुग्णांवर उपचार करण्यात येत असलेल्या बुलडाणा येथील कोविड समर्पित रुग्णालयांमध्ये तीन दिवस पुरेलएवढाच ऑक्सिजन साठा सध्या उपलब्ध आहे. दरम्यान, त्यानुषंगाने ऑक्सिजन उपलब्धतेचे रोटेशन कायम ठेवण्यासाठी आरोग्य यंत्रणा सध्या युद्धपातळीवर प्रयत्नरत असल्याचे एकंदरीत चित्र आहे.

जिल्ह्यातील खासगी व शासकीय अशा जवळपास ५४ ठिकाणी कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यात येतात. दरम्यान, यातील गंभीर रुग्णांना जिल्हा मुख्यालयी असलेल्या कोविड समर्पित रुग्णालयात प्रामुख्याने उपचारासाठी हलविण्यात येते. त्यामुळे येथे खाटांची कायम कमतरता भासत असल्याचे चित्र आहे. गंभीर रुग्ण हे प्रामुख्याने बुलडाण्यातील कोविड समर्पित रुग्णालयात उपचारासाठी आणले जातात. त्यामुळे येथे प्रतिदिन ८ ते ९ मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज भासत असते.

जिल्ह्यातील अन्य ठिकाणांपेक्षा बुलडाणा येथील कोविड समर्पित रुग्णालयात त्यामुळे ऑक्सिजनची अधिक गरज भासत असते. त्यामुळे येथील औषधसाठा, ऑक्सिजनची स्थिती यासह तत्सम बाबीवर आरोग्य विभागाचे बारकाईने लक्ष असते. परिणामी ऑक्सिजन पुरवठ्यासंदर्भात जालना येथील पुरवठादाराशी नियमित स्वरूपात आरोग्य विभागाचा संपर्क राहतो. सध्या रुग्णांचे प्रमाण वाढल्यामुळे ऑक्सिजनचीही मागणी वाढली आहे.

कोविड समर्पित रुग्णालयात २० केएलचा ऑक्सिजन प्लॅन्ट असून, त्यावरच येथील सध्याची मदार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.