नात्याला काळीमा! जन्मदात्या आईवर मुलाचा अत्याचार; नराधम मुलगा फरार

पिंपळगाव सराई येथे मुलाने आपल्या आईवरच बलात्कार केल्याची खळबळजनक घटना शनिवारी रात्री घडली. मागील आठवड्यात मातला येथे एका बापाने आपल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून विष पाजले होते.

0 6

बुलडाणा : पिंपळगाव सराई येथे मुलाने आपल्या आईवरच बलात्कार केल्याची खळबळजनक घटना शनिवारी रात्री घडली. मागील आठवड्यात मातला येथे एका बापाने आपल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून विष पाजले होते. त्यानंतर ही घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. रायपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पिंपळगाव सराई हे गाव येते. ४७ वर्षीय आरोपी मुलाची पत्नी गावाला गेली असल्याने घरात दोघेही मायलेक झोपी गेले. रात्री अचानक त्याने घराची कडी लावून आईवरच लैंगिक अत्याचार केला. दारूच्या नशेत यापूर्वीही त्याने पत्नीसह आईला मारहाण केली आहे. याविरुद्ध पीडित आईने मुलाविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मुलगा फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

__ATA.cmd.push(function() { __ATA.initDynamicSlot({ id: 'atatags-1371087191-60d34ce64a30b', location: 120, formFactor: '001', label: { text: 'Advertisements', }, creative: { reportAd: { text: 'Report this ad', }, privacySettings: { text: 'Privacy settings', } } }); });

Leave A Reply

Your email address will not be published.