VIDEO : भाईचा बड्डे पडला महागात, 5 मित्रांचे पोलिसांनी वाजवले बारा

वाढदिवस म्हटलं की रस्त्यावर गाडी लावून केक कापण्याचं नवं फॅड आजकालच्या तरुणांच्या डोक्यात शिरलंय (Buldhana Police arrest five friend who celebrate birthday on road in midnight)

0 27

खामगाव शहरातील बाळापूर फैलच्या सुदर्शन चौकात काही लोक एकत्र जमून वाढदिवस साजरा करत होते. याबाबत शहर पोलिसांना माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस तातडीने सुदर्शन चौकात पोहोचले. यावेळी त्यांना पाच जण रस्त्यावर गाडी आडवी लावून गाण्याच्या ठेकावर तोंडाला मास्क न लावता डान्स करताना दिसले (Buldhana Police arrest five friend who celebrate birthday on road in midnight).

पाच जणांवर गुन्हा दाखल

यावेळी घटनास्थळी पोलीस पोहोचल्याचे काही जणांना लक्षात आलं. त्यांनी लगेच पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांना बर्थडे बॉय रोहन संजय बामणेट याला तलवारीसह पकडण्यात यश आले. पोलिसांनी बर्थडे बॉय रोहन सह 5 युवकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित घटनेचा व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत तरुण कशाप्रकारे भर रस्त्यात वाढदिवस साजरा करत आहेत, ते स्पष्टपणे दिसत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत एका बाईकवर तीन केक ठेवण्यात आले आहेत. तसेच व्हिडीओत तरुणाच्या हातात तलवारही दिसत आहेत. तो तलवारीने केक कापतो. तर इतर तरुण संबंधित घटना मोबाईलमध्ये कैद करताना दिसत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.