बुलडाणा : मुलीला 5 वेळा पाहिल्यानंतर दिला नकार; बंद खोलीत नवरदेवाला लाथा-बुक्क्यांचा पाहुणचार

बुलडाण्यात घडलेल्या या प्रकाराची सध्या खूप चर्चा सुरू आहे.

0 85

बुलडाणा : बुलडाण्याच्या अलमपूर गावात दोन ते चार वेळेस मुलीला पाहण्याचा कार्यक्रम झाला. पाचव्यांदा पाहिल्यानंतर मुलीमध्ये खोट काढणाऱ्या मुलास मुलीकडच्या मंडळींनी मनसोक्त धुलाई करत खोड मोडली आहे. तरुणाला घराबाहेर उभ्या असलेल्या कारमध्ये जाईपर्यंत रागावलेल्या मुलीच्या नातेवाईकांनी लाथा-बुक्क्यांचा पाहुणचार घेतला.

नांदुरा तालुक्यातील अलमपूर येथील मुलीच्या लग्नासाठी अकोला जिल्ह्यातील खापरखेड येथील मुलाकडील मंडळींनी तब्बल 4 ते 5 वेळा मुलीच्या पाहणीचा कार्यक्रम केला इतक्या वेळा पाहून देखील मुलाने मुलीत काही खोट काढली. पाचवेळा मुलगा मुलीला पाहण्यासाठी आला. साखरपुडा झाल्यानंतर मात्र मुलीमध्ये खोट काढणाऱ्या तरुणाची चांगलीच धुलाई करण्यात आली.

नांदुरा तालुक्यातील अलमपूर येथील मुलीच्या लग्नासाठी अकोला जिल्ह्यातील खापरखेड येथील मुलाकडील मंडळींनी तब्बल 4 ते 5 वेळा मुलीच्या पाहणीचा कार्यक्रम केला इतक्या वेळा पाहून देखील मुलाने मुलीत काही खोट काढली.

साखरपुडा झाल्यानंतर मात्र मुलीमध्ये खोट काढणाऱ्या तरुणाची चांगलीच धुलाई करण्यात आली. या प्रकाराला चिडलेल्या मुलीकडील मंडळींनी पुन्हा पाहणीसाठी आलेल्या या मुलाची यथेच्छ धुलाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अकोल्या जिल्ह्यातील तेलहरा तालुक्याच्या खापरखेडामध्ये राहणारा तरुणाने बुलडाणा जिल्ह्यातील नंदुरा तालुक्यातील आलमपुरा गावात मुलगी एक-दोन नाही तर किमान पाच वेळा पाहण्याचा कार्यक्रम केला.

Leave A Reply

Your email address will not be published.