शिवसेनेकडून जळगावात पुतळ्याचे दहन

आ. कुटे यांचा निषेध

0 21

जळगाव जामोद : 

तालुका शिवसेनेतर्फे स्थानिक तहसील चौकात सोमवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळण्यात आला. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तुकाराम काळपांडे, तालुकाप्रमुख गजानन वाघ, नगरसेवक रमेश ताडे, मुस्ताक भाई जान, अक्षय भालतडक आणि शिवसैनिकांची उपस्थिती होती.

केंद्र सरकारकडून सातत्याने महाराष्ट्राला दुजाभावाची वागणूक दिली जाते. वेगवेगळ्या भूमिकेवर केंद्राकडून महाराष्ट्राची अडवणूक केली जाते. रेमडेसिविर, व्हॅक्सिन, ऑक्सिजनपुरवठा. या सगळ्या प्रश्नी केंद्र सरकार महाराष्ट्राला नाहक त्रास. देत आहे.

त्यातच विरोधी पक्षनेते फडणवीस हे केंद्राच्या पावलावर पाऊल ठेवून महाराष्ट्राच्या सध्याच्या काळात अनेक अडचणी निर्माण करीत आहेत. आमदार संजय गायकवाड यांनी केलेले वक्तव्य योग्य असून, तालुका शिवसेना गायकवाड त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचे सांगितले.

शिवसेनेच्या वतीने आ. कुटे यांचाही निषेध करण्यात आला. आमदार गायकवाड यांच्या बाजूने शिवसेना समर्थपणे उभी राहील, अशा प्रतिक्रिया तालुकाप्रमुख गजानन वाघ यांनी व्यक्त केल्या. यावेळी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.