भरधाव कार झाडावर आदळली; चार जण जागीच ठार; अमरावती जिल्ह्यातील घटना

0

अमरावतीः परतवाड्याहून शेगावकडे जात असताना देवरीफाटा ते रौंदळा मार्गावरील खड्ड्यांमुळे भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार झाडावर आदळली. या अपघातात चौघे जागीच ठार झाल्याची घटना सोमवार दि.१० जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास घडली.

परतवाडा येथील काही जण कार क्रमांक (एमएच ३० एआर ९७९६)ने परतवाड्याहून शेगावला अकोट-शेगाव मार्गाने जात होते. रात्रीच्या सुमारास रौंदळ्या फाट्यानजीक खड्डेमय रस्त्यामुळे कारचालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे भरधाव कार ही झाडावर आदळली. या अपघातात कारमधील चौघे जण जागीच ठार झाले आहेत. अपघात एवढा भीषण होता की, कारचा चुराडा झाला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच अकोट पोलीसांनी घटनास्थळावर जाण्यासाठी धाव घेतली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.