Amravati: रस्त्यातून जाणाऱ्या मुलीला ‘आय लव्ह यू’ बोलणे एका अल्पवयीन मुलाला पडले महागात

मिंत्रासोबत 500 रुपयांची पैज लावून रस्त्यातून जाणाऱ्या मुलीला 'आय लव्ह यू' बोलणे एका अल्पवयीन मुलाला चांगले महागात पडले आहे. संबंधित मुलीने स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर तिघाजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

0 48

मिंत्रासोबत 500 रुपयांची पैज लावून रस्त्यातून जाणाऱ्या मुलीला ‘आय लव्ह यू’ बोलणे एका अल्पवयीन मुलाला चांगले महागात पडले आहे. संबंधित मुलीने स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर तिघाजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना अमरावती (Amravati)  जिल्ह्यात बुधवारी (21 एप्रिल) घडली आहे.  ही मुले परिसरात नेहमीच घोळक्याने उभी राहतात. अशी कृत्ये ती नियमित करत असतात, असे मुलीने तक्रारीत नमूद केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील मुलीचे वय आहे. तर, मुलगा 17 वर्षाचा आहे. या घटनेनंतर परिसरात संतापजनक वातावरण निर्माण झाले आहे.

संबंधित मुलगी ही 21 एप्रिल रोजी मैत्रिणीसोबत रस्त्याने पायी चालत जात असताना एका मुलाने तिला अडवले. त्यानंतर तिला आय लव्हू म्हणाला आहे. अचानक घडलेल्या या प्रकाराने मुलगी घाबरली आणि पुढे निघून गेली. याप्रकरणी मुलीने गाडगेनगर पोलिसांत तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. एकाला ताब्यात घेतले आहे. दुसरा आरोपी अल्पवयीन आहे. तर, तिसरा पसार आहे. यापैकी अल्पवयीन मुलाने त्याच्या मित्रासोबत लावलेली 500 रुपयांची पैज जिंकण्यासाठी हे कृत्य केल्याचे चौकशीतून उघड झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गाडगेनगर पोलिसांनी या तिघांविरोधात विनयभंग आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील आय लव्ह यू बोलणार मुलगा अल्पवयीन आहे. दुसऱ्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजत आहेत. तर, तिसरा मुलगा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत, अशी माहिती महाराष्ट्र टाईम्सने त्यांच्या वृत्तात दिली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.