शेगांव तालुक्यातील ग्रामपंचायत भोनगावच्यावतीने परिचारिका दिन उत्साहात साजरा

0 12

शेगांव :
दरवर्षी १२ मे हा जागतिक परिचारिका दिन म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येतो. इसवी सन १८५४ मध्ये क्रिमियन युद्धातील जखमी सैनिकांना मलमपट्टी करणारी आद्य परिचारिका फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा हा जन्मदिवस आहे. त्यांच्याच पावलांवर पाऊल ठेवून परिचारिकांनी रुग्णांची केलेली सेवा करावी म्हणून मानवता सेवा करण्याचा हा गौरव दिवस आहे.
कोरोना संसर्ग परिस्थितीमध्ये निरंतर शिस्तबद्ध व प्रामाणिकपणे सेवा देणाऱ्या,सर्व रुग्णाची सुश्रुषा करण्याची जबाबदारी परिचारिका पार पाडत आहेत,लहान बालकाची,भारताच्या भावी पिढीची अनेक आजार पासून सुटका करण्यासाठी योग्यरित्या लसीकरण करणाऱ्या,तसेच माता बहिणीची किशोरा अवस्थे पासून बालसंगोपन होई पर्यंत त्यांना सर्व सेवा योग्य रितीने देणाऱ्या परिचारिका सन्मान दि.१२ मे रोजी ग्रामपंचायतींच्या वतीने जागतिक परिचारिका दिनाचे औचित्य साधुन आरोग्य सेविका अंजली सोनार,अरूणा शिवदे यांचा पुष्पगुच्छ देऊन कोराना योध्दा म्हणून सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी डॉ. शर्मा, आरोग्य सहाययक आर.पी. निखाडे,मो. शाहीद,अतुल वानखडे,शेंगोकार, ग्राम सेवक टापरे, ग्रामपंचायत सदस्य अनंतराव शेळके,मोरखडे आदीची उपस्थिती होती.

प्राथमिक आरोग्य केंद्र भोनगाव येथे कार्यरत असलेल्या आरोग्य सेविका अंजली सोनार व अरूणा शिवदे यांचा सन्मान करतांना उपस्थित मान्यवर

 

Leave A Reply

Your email address will not be published.