“ठाकरे सरकारने आर्थिक मदतीच्या नावाखाली जनतेच्या तोंडाला पानं पुसली” -चंद्रकांत पाटील

0 1

प्रतिनिधी:- निवास गायकवाड
मुंबई : महाराष्ट्रातील वाढती कोरोना रुग्ण संख्या बघता मंगळवारी रात्री ८:३० वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी १५ दिवसाच्या लॉकडाऊनची घोषणा केली. मात्र या निर्णयानंतर भाजप प्रदेशाध्याक्ष तथा आमदार चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात १५ दिवसांच्या संचारबंदीच्या नावाखाली प्रत्यक्षात लॉकडाऊन लागू केला. हे करताना त्यांनी गरीब गरजू वर्गाला मदत केल्याचा आव आणला. सामान्य जनतेला मोठी मदत केल्याचे दाखवत शब्दांचे खेळ केले. मात्र, प्रत्यक्षात अत्यंत तुटपुंजी तरतूद करून त्यांनी जनतेच्या तोंडाला पाने पुसली आहेत.”

तसेच, रिक्षाचालक साधारणपणे दरमहा सरासरी दहा हजार रुपये कमवत असताना त्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी अवघ्या दीड हजार रुपयांची घोषणा ही अशीच तोंडाला पाने पुसणारी आहे. एकूणच हातावर पोट असणाऱ्यांना मदत करण्यासाठीच्या घोषणा फसव्या आहेत असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हणले आहे.

दरम्यान व्हेंटिलेटर्स, रेमडेसिवीर, ऑक्सिजन, ऑक्सिजनेटेड बेड्स तसेच साधे बेड व राज्याची आरोग्यव्यवस्था सुधारण्याला राज्य सरकारने जास्त भर दिला पाहीजेय. तरच रूग्णांची परवड थांबेल. असा सल्लाही चंद्रकांत पाटीलांनी यावेळी दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.